नाशिक : दिग्दर्शकाने लेखकाकडून खास स्पर्धेसाठी नाटक लिहून घेतलय. नाटक बसू लागतं आणि दिग्दर्शकाला हवं तस नटाकडून परफॉर्म होत नाही.....म्हणून तो चिडतो. नट नाटक सोडतो, त्याने सोडलं म्हणून नायिकाही त्याच्यामागून नाटक सोडते. नाटक व्हायला हवं म्हणून जमवाजमव सुरू होते. नायिका मिळते, पण नट म्हणून पुन्हा त्यालाच बोलवावं लागतं. या घटनांतून अहंभावाच्या विविध कंगोऱ्यांचे दर्शन ‘आम्ही नाटक करतो म्हणजे’ तून होतानाच हौशी संस्थांच्या नाटक सादरीकरणाचे रूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.राज्य नाट्य स्पर्धेत रविवारी दुपारी आम्ही नाटक करतो म्हणजे हे नाटक सादर करण्यात आले. प्रारंभीच्या फाटाफुटीनंतर पुन्हा नवी जमवाजमव यशस्वी होऊ लागलीय, असं वाटतं आणि लेखकाचा अहंकार जागा होतो. यावेळेस नाटक संपलं असं चित्र निर्माण होतं. मग मात्र नाटकाच्या बाहेरचा, म्हणजे पैसे देणाºया राजकीय माणसाचा हस्तक्षेप होतो. आर्थिक दबावापुढे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही नमतं घेतात आणि नाटक होणार हे निश्चित होते... अहंकारालाही कुठे नमतं घ्यावं हे बरोबर कळते. हळूहळू नाटक दूर राहतं आणि अहं जागा होतो. तो इतका वाढतो की मग नाटकच बाजूला पडतं. मग अहं कुरवाळून पुन्हा नाटकाची जमवाजमव करावी लागते. पण तिच्याकडे नर्मविनोदी पद्धतीने बघत त्यातला अहंकाराचा मुद्दा अधोरेखित केला आहे. नाटकाचे लेखन देवेन कापडणीस, तर दिग्दर्शन आणि नेपथ्य तेजस बिल्दीकर यांनी केले. अन्य सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी भूमिका पार पाडल्या.आजचे नाटक : प्रेमा तुझा रंग कसावेळ : सायंकाळी ७ वाजता
‘आम्ही नाटक करतो’मधून अहंभावावर भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:52 AM