जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वरदविनायक एक्सपोर्ट प्रा.लि. येथील कामगारांच्या झोपड्यांमध्ये आयशर घुसल्याने चालक बाळू वामन गांगुर्डे, रा. राजापूर याच्याविरोधात ड्रंक ॲॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहाडी येथील वरदविनायक एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक चेतन बाविस्कर व येथील कामगार यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यातच शुक्रवारी पहाटे ५ वाजता कंपनीत द्राक्ष वाहतूक करणारा आयशर (क्र. एमएच ०४ डीडी ४६८९) हा कामगारांच्या झोपड्यांच्या मधील रस्त्यावर घुसला व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत झाडावर जाऊन आदळला. सर्व कामगारांनी आमचा घातपात करण्याचा कट असल्याचा आरोप केला. तसेच कंपनी परिसरात पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करत उत्तम गोबाले व राजेंद्र गोबाले यांच्या फिर्यादीवरून आयशरचालक बाळू वामन गांगुर्डे व चेतन बाविस्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत.
मोहाडी येथे झोपड्यांमध्ये घुसला आयशर ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 1:00 AM