शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

नाशिकरोडला ईदनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:02 AM

परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले.

नाशिकरोड : परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले.  मिरवणूकीला सकाळी गोसावीवाडीतून प्रारंभ झाला. मिरवणूक आंबेडकर पुतळा रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, मुक्तीधाममार्गे अनुराधा चौकात आली. सत्कार पॉईन्ट, देवळाली गाव, विहितगाव मार्गे देवळालीगाव, गाडेकर मळा येथे आल्यावर मिरवुणकीचा समारोप झाला. तेथे मुख्य प्रवक्ते सैय्यद याकुब रजा काद्री यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मौलाना मुस्ताक रजा, मौलाना शोएब, मौलाना जाफर, मौलाना मुफ्ती रहिमान रजा, मौलाना हारूण रशिद, मौलाना अब्दुल अजीज, मौलाना गुलजार अहमद, मौलाना जफर, मौलाना सैय्यद इरफान आदी उपस्थित होते. मिरवणुकीत मंडळांनी जगप्रसिध्द मशिदींचे तसेच सामाजिक उपक्रमावर आधारीत देखावे सादर केले होते. ईदच्या मिरवणुकीचे विविध पक्ष व संघटनांनी स्वागत केले. सरबत, खाद्य पदार्थांचे वाटप केले. सिन्नर फाटा येथे मनसेचे विभाग प्रमुख साहेबराव खर्जुल यांच्या वतीने मंडळांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.अनुराधा मित्र मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक सुर्यकांत लवटे, राजू लवटे आदी उपस्थित होते. भाजप आणि नाशिकरोडच्या मित्रमेळा परिवारातर्फे चित्ररथांचे स्वागत करून मिठाई वाटप करण्यात आली. आमदार बाळासाहेब सानप, प्रभाग सभापती पंडित आवारे, राजेंद्र ताजणे यांनी स्वागत केले. नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, सुनंदा मोरे, नगरसेवक संभाजी मोरस्कर आदी उपस्थित होते.या मंडळांचा सहभागमिरवुणकीत मोहम्मदिया एज्युकेशन सोशल ग्रुप अ‍ॅन्ड मल्टीपर्पज वेल्फेअर असोसिएशन, हिंद सोशल वेल्फेअर आॅर्गनायझेशन, अजमेरी ग्रुप, अलहुसेनी वेल्फेअर ट्रस्ट, संजेरी सरकार फ्रेन्डस सर्कल, चॉँदतारा मशिद फ्रेन्ड सर्कल, रजा सोशल ग्रुप, के. जी. एन. सोशल ग्रुप, हिंदुस्थान सोशल ग्रुप, टिपू सुल्तान फ्रेन्ड सर्कल, हनाफिया नवजवान कमिटी, नाशिकरोड देवळाली मुस्लिम खाटीक समाज आदी मंडळांनी सहभाग घेतला

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम