शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 5:45 PM

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे.

ठळक मुद्देजय्यत तयारी अंतीम टप्प्यात‘अयोध्या’बाबत ‘जो हुवा, अच्छा हुवा’ अशीच प्रतिक्रियातणावाचे कारण ठरणाऱ्या मुद्याचा अखेर ‘सुप्रीम फैसला’ जुने नाशिकमधून रविवारी ‘जुलूस-ए-मुहम्मदी’

नाशिक : मुस्लीम बहुल भागात प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’च्या तयारीचा उत्साह बघावयास मिळाला. शनिवारी (दि.९) सकाळपासूनच मुस्लीम बहुल भागात तरूणाई घरे, दुकाने व आपला परिसर सजविण्यात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सायंकाळपासून अंतीम टप्प्यात आलेल्या सजावटीच्या तयारीने अधिकच जोर धरला. जुने नाशिक, वडाळागाव, विहितगाव, देवळाली कॅम्प आदि भागात मुस्लीम तरूण मित्र मंडळांसह विविध संघटना, संस्थांकडून आपआपला परिसर आकर्षक पध्दतीने सजविण्यावर भर दिला जात होता.नाशिक : इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) येत्या रविवारी (दि.१०) शहर व परिसरासह जिल्ह्यात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहराची बाजारपेठ सजली आहे. घरे, दुकानांसह आपापला परिसर सजविण्याची लगबग मुस्लीम बहुल भागात पहावयास मिळत आहे. मशिदींवर करण्यात आलेल्या रोषणाईने नूर पालटला आहे.दरवर्षी उर्दू महिना ‘रबीउल अव्वल’च्या १२ तारखेला ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. मुस्लीम बहुल भागात सजावट साहित्य विक्रीचे दुकाने थाटली आहेत. हिरवे, पांढरे झेंडे, पताका, चमकी, विद्युत रोषणाईच्या माळा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सजावट साहित्यांना मागील तीन दिवसांपासून असलेली मागणी पैगंबर जयंतीच्या पुर्वसंध्येला अधिकच वाढली. नागरिकांकडून घरे, दुकाने सजविण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच विविध युवक मित्रमंडळांकडून आपापला परिसर सजविण्यासदेखील प्राधान्य दिले जात आहे. परिसर सजविताना रस्त्याच्या दुतर्फा झेंडे, स्वागत कमानी लावण्यात येत आहेत. तसेच रोषणाईसाठी मंडप उभारणीवर भर दिला जात आहे. जुने नाशिक, वडाळागाव, देवळाली कॅम्प, नाशिकरोड या भागात गल्ली-बोळात मिलादच्या तयारीने वेग घेतला आहे. सजावट करण्यासह विविध प्रकारचे आकर्षक धार्मिक देखावे उभारणीही सुरू आहे. बहुतांश सामाजिक सांस्कृतिक मित्रमंडळांचे देखावे पुर्णत्वास आले आहेत. देखावे उभारताना किंवा स्वागत कमानी, फलक लावताना कु ठल्याही प्रकारे रहदारीला तसेच मुख्य मिरवणूकीला अडथळा होणार नाही,याबाबतही दक्षता घेतली जात आहे.

अयोध्या’बाबत ‘जो हुवा, अच्छा हुवा’ अशीच प्रतिक्रियादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे या निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. मागील अनेक वर्षांपासून वादग्रस्त व तणावाचे कारण ठरणाऱ्या मुद्याचा अखेर ‘सुप्रीम फैसला’ कायमस्वरूपी झाल्याचे समाधानदेखील मुस्लीम समाजात पहावयास मिळाले. ‘जो हुवा वो बहुत अच्छा हुवा’ अशी प्रतिक्रीया समाजाच्या नेत्यांकडून उमटली.‘जुलूस-ए-मुहम्मदी’चे नियोजनजुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड या भागातून सालाबादप्रमाणे पारंपरिक पध्दतीने पैगंबर जयंतीनिमित्त येत्या रविवारी मिरवणुकांचे (जुलूस) आयोजन करण्यात आले आहे. वडाळागावातून जामा गौसिया मशिदीपासून सकाळी ९ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच नाशिकरोडमधूनही सकाळच्या सुमारास जुलूस निघणार आहे. मुख्य ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ जुने नाशिकमधून रविवारी दुपारी ३ वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.अन्नदानाची जय्यत तयारीपैगंबर जयंतीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे बागवानपुरा चौकात येथील मुस्लीम युथ ग्रूपच्या वतीने सामुहिकरित्या अन्नदान केले जाणार आहे. यासाठी पुर्वसंध्येपासूनच तयारी पुर्ण करण्यात आली आहे. शेकडो किलोचे अन्नदान दरवर्षी या ठिकाणी पैगंबर जयंतीच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान केले जाते. यंदाही हा कार्यक्रम पार पडणार आहे. शनिवारी दुपारपासून यासाठी तरूणाई तयारी करताना दिसून आली.

टॅग्स :NashikनाशिकProphet Muhammad Paigambarप्रेषित मुहम्मद पैगंबरIslamइस्लामEid e miladईद ए मिलादAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय