येवला :विश्वशांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद )येवल्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. रंगी बेरंगी हतातील पताका ध्वज घोडेस्वार व् बाल गोपाळांची हजेरी हे मिरावणुकीचे वैशिष्ट्य होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त नारे तकबीर अल्लाहू अकबर च्या घोषणा देण्यात आल्या. मिरवणुकीच्या पुढे आण िमागे नातेपाक व् मिलाद सादर करण्यात आली. नागड दरवाजा, आझाद चौक, पिंजार गल्ली, पाटिलवाडा, बुरु डगल्ली, मेनरोड, शिनपटांगण, नगरपालिका रोड आदि मार्गाने कोर्टरोड वरील वली मैदानावर मिरावणुकीची सांगता झाली. ईदगाह वली मैदानावर सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान ठीक ठिकाणी हिंदु बांधव व् विविध मंडळे शांतता कमिटी, ग्रीन कँडल ग्रुप यांच्या वतीने मिरावणुकीचे स्वागत करु न एकतेचा संदेश दिला. शांतता कमिटीच्या वतीने नगरसेवक प्रवीण बनकर,अविनाश कुक्कर डॉ.भूषण शिनकर, महेंद्र पगारे, विजय घोडेराव,आकाश घोडेराव यांनी माजी नगराध्यक्ष हुसेन शेख ,शहर काझी राफिउिद्दन,अजीज शेख, मुस्ताक शेख,अकबर शाह,अन्सार शेख, निसार शेख, अन्वर घासी, अय्युब शाह,अमजद शेख आलमगीर शेख,अब्दुल मलिक, यांचेसह मुस्लिम बांधवांचा आझाद चौकात सत्कार केला.राजे रघुजीराजे शिंदे यांनी येवल्यात ३६० वर्षापूर्वी मुस्लीम बांधवांसाठी नमाज पडण्यासाठी बांधलेली मशीद हा येवल्याचा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा इतिहास असल्याचे सांगून जेष्ठ नेते माणकिराव शिंदे,यांनी सामाजिक एकता राखण्याची परंपरा येवल्याने कायम राखली असल्याचे सांगितले. काझी राफिउिद्दन, यांनी महम्मद पैगंबरानी जीवनात आदर्श व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या शिकवणीवर चालण्याचे आवाहन केले. (21येवला ईद)
येवला शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 4:31 PM
येवला :विश्वशांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद )येवल्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ठळक मुद्देशहरातील मुस्लीम बांधवांनी ईद मिलादुन नबवी उत्सव मोठ्या उत्साहाच्या आ िणशांततेच्या वातावरणात साजरा केला. शहर काज़ी हाजी रिफद्दीन यांच्या नेतृत्वा खाली सकाळी ठीक ९ वा मिरवणुकीस आईना मशीद येथून प्रारंभ झाला.