शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:46 PM

मालेगाव : सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतली गळाभेटमालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी सामुदायिक नमाजपठण करण्यात आले.

ठळक मुद्देसामूहिक नमाज अदा करण्यात आली.

मालेगाव : सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतली गळाभेटमालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी सामुदायिक नमाजपठण करण्यात आले.ईदनिमित्त शहरातील कालीकुट्टी, सोनापुरा कब्रस्तान, सेंट्रल इदगाह ग्राउण्ड, शिया कब्रस्तान, जुमा मशीद, हुसेनी मशीद, मन्सुरा महाविद्यालय, आयेशानगर कब्रस्तान, गोल्डननगर मिल्लत मदरसा, खलीलशेठ मळा, चिंचमळा, ब्राह्मणपाडा, इस्जतेमानगर, मुफ्ती-ए-आजम इदगाह, भिकन शहा दर्गा, कल्लु स्टेडियम, खानका मशीद आदी ठिकाणी सामूहिक नमाज अदा करण्यात आली.मुख्य नमाजनंतर मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा राष्टÑीय एकात्मता व शांतता समिती, महसूल विभाग व पोलीस दलाकडून अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, केवळ हिरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.हिंदू बांधवांकडून मुस्लीम बांधवांना ईदच्या गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन झाले. नमाजसाठी जाणाºया व नमाजनंतर परतणाºया मुस्लीम बांधवांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व सरबतची व्यवस्था हिंदू बांधवांनी केली होती. येथील मोसमपुलावर मुस्लीम बांधवांचे स्वागत करण्यात येत होते. ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.पोलीस कवायत मैदानावर धातुशोधक यंत्राच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत होती. तसेच मनोऱ्यांवरून विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक हगवणे, नवले यांनी बंदोबस्तावर विशेष लक्ष ठेवले होते. ईदच्या नमाजनंतर पर्यटनासाठी जाणाºया मुस्लीम बांधवांनी येथील नवीन व जुन्या बसस्थानकावर गर्दी केली होती. शहराच्या पूर्वभागात दिवसभर उत्साहाचे वातावरण दिसून आले.चांदवड : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रसिद्ध नानावली मशीद येथे चौक मशीद, तांबट मशीद, शाही जुम्मा मशीद येथे धार्मिक कार्यक्रम व नमाजपठाण कार्यक्रम संपन्न झाले तर मुस्लीम बांधवांनी शिवाजी चौकातून मिरवणुकीने सोमवार पेठ, आठवडे बाजार, विश्रामगृहमार्गे जाऊन पुरातन इदगाह पटांगणावर मौलाना आबीद ऊर रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. नाईकवाडापुरा नानावली मस्जीद येथे मौलाना हासीन अबू नसर अब्दुल करीम शेख, चांदवड येथील चौक मस्जिद शिवाजी चौक येथे मौलाना हाजी सुलतानखान रहेमान व शहादाब अफतारी यांनी नमाजपठाण केले. पाऊस पडावा म्हणून मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. त्यानंतर इदगाह पटांगण येथे मोठा शामीयाना उभारून तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक विशाल सणस व विविध पक्षांच्या नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्यात. यावेळी मुन्नुभाई घासी, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अशपाक खान अन्वर शहा, रिजवान घासी, मौलाना अख्तरभाई, मकसूद घासी, जाहीद घासी, फिरोजभाई पठाण, परवेज पठाण, गुल्लुभाई घासी, जाकीर शहा व मुस्लीम बांधव उपस्थित होते.