नााशिक : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ६ हजार १०१ शिक्षक, शिक्षकेेतरांसह महापालिका क्षेत्रातील २,४४३ शिक्षक शिक्षकेतरांची कोरोनाचा चाचणी करण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यातील १,५४३ शाळांमधील नववी ते बारावीच्या जवळपास ८ हजार ५४४ शिक्षकांची चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात महापालिका क्षेत्रातील सुमारे ९० शिक्षकांची चाचणी गुरुवारीच झाली असून, जिल्हा परिषद क्षेत्रात सोमवार (दि. २८) पासून तालुकास्तरावर चाचणी करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाकडून ४ जानेवारीपासून जिल्हाभरातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी शिक्षण उपसंचालकांनी आवश्यकतेनुसार चाचण्या करण्याचे सूचित केले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त सूचनांनुसार नववी ते बारावीच्या वर्गांना शिकविणारे गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांचे तीन शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई व कारकून अशा सहा व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ६ हजार १०१ शिक्षक, शिक्षकेेतरांसह महापालिका क्षेत्रातील २,४४३ शिक्षक शिक्षेत्तरांची कोरोनाचा चाचणी करण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यातील १,५४३ शाळांमधील नववी ते बारावीच्या जवळपास ८ हजार ५४४ शिक्षकांची चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात महापालिका क्षेत्रातील सुमारे ९० शिक्षकांची चाचणी गुरुवारीच झाली असून, जिल्हा परिषद क्षेत्रात सोमवार (दि. २८)पासून तालुकास्तरावर चाचणी करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असून, एका केंद्रावर शंभर किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर दिवसभरात सुमारे १ हजार शिक्षकांच्या चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या शिक्षकांनी शहरातील तपासणी केंद्रावर गर्दी न करता आपले सेवा क्षेत्र असलेल्या तालुक्यात चाचणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.