नगरसुल : येथील ग्रामीण रु ग्णालयातून कोरोना मुक्त झालेल्या ३ महिला व ५ पुरुष अशा आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांना टाळ्या वाजवून व मिठाई वाटप करत घरी पाठविण्यात आले.ग्रामिण रु ग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे, डॉ. मदनुरे, वैदयकीय अधिक्षक डॉ. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून सदर रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णांना निरोप देण्यात आल्यानंतर त्यानंतर त्यांना सात दिवस होम कॉरण्टाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांची तालुका कोरोना नोडल आॅफिसर म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . येवला तालुक्याची कोरोना बाधीताची संख्या १५९ वर पोहचली असून आतापर्यंत १२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सदद्यस्थितीत तालुक्यात ३९ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी घरोघरी सर्वे केला जात आहे.
नगरसूलमधील आठ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:34 PM
३ महिला व ५ पुरुष अशा आठ जणांना डिस्चार्ज
ठळक मुद्देसात दिवस होम कॉरण्टाइन राहण्याच्या सूचना