नाशिक : रुग्णालये व कार्यालयांमध्ये फर्निचरच्या कामांतर्गत वापरल्या जाणाऱ्या जाड काचांचे सुमारे४० शिट गुरुवारी (दि.१९) सारडा सर्कल परिसरातील एका दुकानामध्ये कामगाराच्या अंगावर कोसळले. या शीटच्या आठशेकिलो वजनाखाली दबलेल्या तरुण कामगाराला तासाभराच्या ‘रेस्क्यू आॅपरेशन’नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले; मात्र उपचारादरम्यानसंध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झालाजुने नाशिकमधील सारडासर्कल परिसरात विविध फॅब्रिकेशन व ग्लास मेकर्सची दुकाने आहेत. या भागात असलेल्या हुजैफाभाई पत्रावाला यांच्या मालकीचे ग्लास मेकर्सच्या दुकानात काम करणारा साबीरअली शेख (३०, रा. जुने ना२शिक, मुळ उत्तरप्रदेश) हा युवक नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानकपणे जाड काचांचे तीस ते चाळीस शिट खाली कोसळले. यामध्ये तो कामगार दाबला गेला. परिसरातील व्यावसायिक व कामगारांना सदर प्रकार लक्षात आल्यानंतर एकच धावपळ उडाली. मोठ्या संख्येने अखंड काचांच्या शिटखाली अडकलेल्या युवकाला बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रत्यक्षदर्शींकडून तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. जवानांनी तत्काळ दुकानामध्ये प्रवेश करून गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशनला दुपारी साडेतीन ३.३० वाजेच्या सुमारास सुरुवात केली. पत्र्याचे दुकान आणि जमलेली गर्दी व फुटलेल्या काचांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. लिफ्टिंग बॅगा कोसळलेल्या काचांच्या ढिगाखाली ठेवून जवानांनी त्यामध्ये गॅस भरण्यास सुरुवात केली. यामुळे कामगाराच्या अंगावर असलेला काचांचा भार वरच्या दिशेने उचलला गेला. जवानांनी मोठ्या कौशल्याने इलेक्ट्रॉनिक कटरचा वापर करून काचेचे शिट कापून काढले. या दुर्घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या कामगाराला सुखरूपपणे जीवंत बाहेर काढण्यास दुपारी ४.३० वाजता यश आले. शासनाच्या १०८ या आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देणाºया रुग्णवाहिकेतून त्या जखमी कामगाराला उपचारार्थ रुग्णालयात त्वरित हलविण्यात आले. मुंबईनाका परिसरातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. शेख याच्या छाती व पोटाला गंभीर दुखापत झाली होती, असे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.कृत्रिम श्वसन यंत्रांचा वापरअरुंद पत्र्याचे दुकान व त्यामध्ये बघ्यांची आणि जवानांना मदतकार्य करणाºया स्थानिक तरुणांची झालेली गर्दी यामुळे दुकानात वारा जाणे अशक्य झाले होते. काचेच्या शीटचा भार अंगावर असल्यामुळे त्याखाली दाबल्या गेलेल्या युवकाला प्राणवायू मिळणे कठीण झाले होते. यावेळी तत्काळ जवानांनी शुद्ध हवा असलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रांचा वापर करत सिलिंडरद्वारे प्राणवायू उपलब्ध करून दिल्याने जखमी युवकाला जिवंत बाहेर काढता आले.
आठशे किलोच्या काचा अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:36 AM
नाशिक : रुग्णालये व कार्यालयांमध्ये फर्निचरच्या कामांतर्गत वापरल्या जाणाऱ्या जाड काचांचे सुमारे ४० शिट गुरुवारी (दि.१९) सारडा सर्कल परिसरातील एका दुकानामध्ये कामगाराच्या अंगावर कोसळले. या शीटच्या आठशे किलो वजनाखाली दबलेल्या तरुण कामगाराला तासाभराच्या ‘रेस्क्यू आॅपरेशन’नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले; मात्र उपचारादरम्यानसंध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला
ठळक मुद्देतासभर बचावकार्य रुग्णालयात मालवली प्राणज्योत