नाशिक : तुमच्या बॉसचा नंबर काय, जवळच्या मित्राचा नंबर सांगा, असे सांगणाऱ्या दहापैकी आठ पुरूषांना त्यांच्या पत्नीचा नंबर काय हेच आठवले नाही. लोकमतच्या रिॲलिटी चेकमध्ये हा प्रकार आढळला आहे. बहुतांश अशा प्रकारच्या पुरूषांनी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्याने तोंडी पाठ ठेवण्याची गरज आहे.
पूर्वी लॅंडलाईन नंबर पाठ असायचे. आवश्यक नंबर्सची डिरेक्टरी असली तरी ज्या व्यक्तींची सारखी गरज पडते आणि आपण त्यांना फोन करत असू, त्यांचे नंबर पटकन पाठ असायचे. परंतु मोबाईलमध्ये मेमरी साठवण्याची सोय झाली आणि मग तोंडी पाठ नंबर गेले. घरातील सर्व नंबर सेव्ह असल्याने ते पाठ ठेवण्याची गरज राहिली नाही. पुरूषांच्या आयुष्यात अर्धांगिनीचे महत्व खूप असले आणि दिवसाला अनेकवेळा फोन असला तरी नंबर सेव्ह आठवत नाही, अशी अवस्था आहे. अनेकांना पत्नीचा नंबर पाठ नाही का, असे विचारल्यानंतर अनेकांना हसू फुटले. मात्र, ज्या ठिकाणी काम करतो, त्या दुकानदार किंवा ऑफीसच्या बॉसचा नंबर मात्र चटकन सांगता आला. तर पाच जणांना मित्रांचे नंबर तोंडी पाठ असल्याचे आढळले आहे. अर्थात, दिसायला हा साधा विषय असला तरी खूप गंभीर असून, मोबाईलमुळे विस्मरणाचे अनेक आजार होऊ शकतात, असे जाणकार तज्ज्ञांनी सांगितले.
इन्फोे...
पोरांना आठवते, मोठ्यांना का नाही?
कोट...
कृत्रिम बुध्दिमत्तेला चालना देणाऱ्या साधनांचा अतिरिक्त वापर तसेच या साधनांवर अतिअवलंबित्व, यामुळे साधे नंबर न आठवण्याचे प्रकार घडत असतात. नव्या पिढीची बौध्दिक क्षमता अधिक असल्याने मुलांना चटकन नंबर आठवतात. त्या तुलनेत मोठ्यांना आठवत नाहीत. अर्थात, यातून भविष्यात मेंदू आणि मज्जा संस्थेशी संबंधीत अनेक आजार वाढण्याची शक्यता आहे.
- डॉ. अमोल कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
इन्फो...
लोकमत ठक्कर बाजार
- सिडकोतील एका पुरूषाने बायकोचा मोबाईल नंबर सांगितला, परंतु नंतर दात, जीभ चावली, चुकीचा नंबर असल्याचे सांगितले.
- पंचवटीत राहणाऱ्या युवकाने बायकोचा नंबर सांगितला. मात्र, नंतर तो सॉरी, हा जुना नंबर असल्याचे सांगितले.
- कॉलेजरोडवर राहणाऱ्या एका नागरिकाला परगावी असलेल्या आपल्या बायकोचा नंबर सांगता आला नाही, मात्र, सध्या रूम पार्टनरबरोबर राहात असल्याने त्याचा नंबर मात्र बरोबर सांगितला.
- जुन्या नाशकात कथडा येथे राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याने तो मेनरोडवरील ज्या दुकानात काम करतो, तेथील मालकाचा नंबर बरोबर सांगितला. बायकोचा नाही.
- अशोकस्तंभावरील एका ज्येष्ठ नागरिकाने बायकोचा नंबर बरोबर सांगितला. इतकेच नव्हे तर मुलाचाही नंबर बरोबर सांगितला.
इन्फो...
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना!
कोट १
मी नेहमी फोन करते. पण ‘त्यांचा’नंबर आठवत नाही. तो मोबाईलमध्ये सेव्ह आहे. त्यामुळे सर्च केला की पटकन सापडून जातो. नंबर लक्षात ठेवण्याची कधी गरजच पडली नाही.
- एक महिला, सिडको
कोट २
माझे मिस्टर कंपनीत कामाला जातात. तेथून थेट घरी येतात. कंपनीत माेबाईल घेऊ देत नाहीत. त्यामुळे नंबर लक्षात नाही. मात्र, मैत्रीण आणि आईशी दरराेज बोलणे होत असल्याने त्यांचे नंबर लक्षात आहेत.
- एक महिला, रविवार पेठ
इन्फो....
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
कोट..
आई आणि बाबा दोघेही घरी नसतात. त्यामुळे त्यांना मी नेहमी फोन करतो. पण आई आणि बाबा असे दोेघांचेही नंबर पाठ आहेत. माझ्या शाळेतील मित्राच्या वडिलांचा नंबरसुध्दा मला पाठ आहे. मी त्यांना नेहमी फाेन करतो.
- मंदार देशपांडे, व्दारका
कोट..
माझे कोणतेही आकडे पटकन पाठ हाेतात. त्यामुळे आई आणि बाबांचा नंबर पटकन पाठ होतो. ऑनलाईन शिक्षणामुळे माझ्यासाठी मोबाईल घेतला आहे. त्यामुळे मी त्याचा नियमित वापर करते.
- सुवर्णा क्षीरसागर, कॉलेजरोड