नाशिक : शहरातील पाच, तर ग्रामीणला तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्णात सोमवारी नवीन ३३४ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ७२५ वर पोहोचली आहे.महानगरातील बाधितांची संख्या १६१ वर आणि ग्रामीणच्या १६८ रुग्णांची भर पडली. जिल्ह्णातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेल्या प्रचंड वाढीच्या पार्श्वभूमीवर मनपा आणि आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्णात विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळेच सोमवारपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ५९० वर पोहोचली आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्णात २७०३ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यात नाशिक मनपा हद्दीत सर्वाधिक १६०३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर अन्यपैकी ग्रामीण रुग्णालयांमध्ये ४५७, डॉ. पवार मेडिकल कॉलेज ११४, मालेगाव रुग्णालय ६९, तर गृहविलगीकरण कक्षात ३८१ जणांचा समावेश आहे.दरम्यान, सोमवारी एकूण ६५८ नवीन रुग्ण दाखल झाले असून, त्यात मनपा रुग्णालयांमध्ये २४६, ग्रामीण रुग्णालयांमध्ये २८६, मालेगाव रुग्णालये १४, जिल्हा रुग्णालयात ७, तर गृहविलगीकरणात १०३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्णातील ७७४ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत असून येत्या दोन दिवसांत चाचण्या वाढविण्यात येणार असल्याने रुग्णसंख्या तसेच प्रतीक्षेतील अहवालांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 2:27 AM
नाशिक शहरातील पाच, तर ग्रामीणला तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्णात सोमवारी नवीन ३३४ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ७२५ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्देदिवसभरात आढळले ३३४ नवीन बाधित