कळवण : येवला तालुक्यातील मुखेड परिसरातून रानडुकराची शिकार करून कळवण तालुक्यातील वाडी बु।। परिसरात त्याच्या मांसाची विल्हेवाट लावणाºया आठ संशयित आदिवासी आरोपींना वनविभागाचे अधिकारी बशीर शेख यांनी सोमवारी रात्री ११ ते १२ वाजेदरम्यान अटक केली. त्यांच्याकडून १०० किलो मांस, पिकअप व्हॅन व १५ दुचाकी ताब्यात ुघेण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या आठ संशयितांना कळवण न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संक्रांतीची कर आणि अमावास्या असल्याने आदिवासी बांधव प्राण्यांची शिकार करतात. संस्कृतीचे प्रतीक म्हणून शिकार केलेल्या प्राण्यांच्या मांसाचे वाटप करून कर अमावास्या साजरी केली जाते. आदिवासी भागात ही परंपरा रुढ असल्याने प्रचलित पद्धतीने कळवण तालुक्यातील बेदीपाडा, गोपालखडी, बालापूर, हिंगळवाडी येथील आठ संशियत आदिवासी सोमवारी पहाटेच्या सुमारास येवला तालुक्यातील मुखेड परिसरात रानडुकराची शिकार करण्यासाठी गेले होते. वाडी बु।। येथे संशयित आठ आदिवासी आरोपी रानडुकराच्या मांसाची विल्हेवाट लावत असल्याची माहिती खबºयाने वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार शेख यांनी वनपाल शशिकांत वाघ, शंकर हिरे, पंकज देवरे व एस. एन. निकम यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन संशयित पुंडलिक हरी बर्डे (५०), संजय नामदेव महाले (३०), पंढरीनाथ दगडू गांगुर्डे (३२), मंगेश देवीदास चव्हाण (१८), मनोहर लक्ष्मण बागुल (२०), नामदेव दगडू गांगुर्डे (४५), दामू लहानू गांगुर्डे (५३), धनराज श्यामराव वाघ (२९) यांना अटक केली. शिकार व मांस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पीकअप व्हॅन, १५ दुचाकी व घटनास्थळी आढळून आलेले १०० किलो रानडुकराचे मांस वनविभागाने ताब्यात घेतले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, या शिकार प्रकरणात अजून किती जण सहभागी आहेत याचा तपास वनविभागाचे विभागीय वन अधिकारी व्ही. टी. घुले, सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, वन परीक्षेत्र अधिकारी बशीर शेख करीत आहेत. बुधवारी मुखेड परिसरात वनविभागाची यंत्रणा तपास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रानडुक्कर शिकार प्रकरणी आठ संशियतांविरुद्ध भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ कलम ९ व ५१, भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिकार प्रकरणात सामील असलेल्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी व गुन्ह्यात वापरलेली इतर वाहने जप्त करण्यासाठी विभागीय वनअधिकारी व्ही. टी. घुले, सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, परीक्षेत्र अधिकारी बशीर शेख पुढील तपास करणार आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांना मंगळवारी कळवण येथील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात बसून ठेवण्यात आले होते. त्याकडे चौकशी करण्यात आली. विभागीय वनअधिकारी घुले, सहायक वनसंरक्षक गायकवाड, दिंडोरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर, फिरते पथक वनपरीक्षेत्र अधिकारी बी. पी. पाटील, कनाशीचे वनपरीक्षेत्र अधिकारी सी. डी. कामडे यांनी त्यांची चौकशी केली.
रानडुक्कर शिकार प्रकरणी आठ जणांना अटक दोन दिवसांची कोठडी : कळवण वनविभागाने केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:26 AM
कळवण : मुखेड परिसरातून रानडुकराची शिकार करून वाडी बु।। परिसरात त्याच्या मांसाची विल्हेवाट लावणाºया आठ संशयित आदिवासी आरोपींना वनविभागाचे अधिकारी बशीर शेख यांनी अटक केली.
ठळक मुद्देदोन दिवसांची पोलीस कोठडीघटनेचा पंचनामा