नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात विविध प्रकारच्या गुन्'ांमध्ये शिक्षा भोगत असलेले जिल्'ातील आठ कैदी संचित व पॅरोल रजेवर बाहेर आल्यानंतर पुन्हा परतलेले नाहीत़ त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील तीन, तर येवला, दिंडोरी, बागलाण, निफाड व सिन्नर तालुक्यांतील प्रत्येकी एका कैद्याचा समावेश आहे़ गत दोन वर्षांपासून फरार असलेल्या या कैद्यांचा ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ न्यायालयाने विविध गुन्'ांमध्ये शिक्षा ठोठावलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे आजारपण वा निधन, विवाह समारंभ यासाठी पॅरोल वा संचित रजा मंजूर केली जाते़ त्यासाठी प्रथम तुरुंग महानिरीक्षकांकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे पाठविला जातो़ आयुक्त संबंधित पोलीस ठाण्याकडून संबंधित कैद्याचा अहवाल मागवितात व त्यानुसार पॅरोल मंजूर वा नामंजूर करतात़ मात्र, बहुतांशी प्रकरणात पॅरोल वा संचित रजा संपल्यानंतर कैदी कारागृहात हजर न होता फरार होत असल्याचे समोर आले आहे़ नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जिल्'ातील आठ कैद्यांनी कौटुंबिक आजारपण व विवाह समारंभासाठी पॅरोल, संचित रजा मंजूर करण्यात आली़ त्यानंतर रजेवर आलेले हे कैदी रजा संपूनही कारागृहात परतलेले नाहीत़ त्यामध्ये विजय प्रभाकर देसले (सावकारवाडी, ता़ मालेगाव), अंबादास भीमराव बोरसे (मु़ पो़ वजीरखेडे, ता़ मालेगाव), शिवाजी दत्तू पाटील (कुसुंबारोड, शिवाजीनगर, मालेगाव), बाळासाहेब चांगदेव घुले (जळगाव, ता़ येवला), दौलत त्र्यंबक चतुर (कांजीमळा, ता़ दिंडोरी), अशोक उत्तम खैरनार (मु़ पो़ डोंगरेज, ता़ बागलाण), दिनकर कचरू पगारे (मु़ पो़ उगाव, ता़ निफाड), अमोल एकनाथ गंगावणे (मु़ पो़ मुसळगाव, ता़ सिन्नर) यांचा समावेश आहे़ नागरिकांना या फरार कैद्यांबाबत माहिती असल्यास त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे अथवा ग्रामीण पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय मोहिते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहा. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पोलीस उपनिरीक्षक एम़ एस़ रणमाळे यांनी केले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
संचित, पॅरोल रजेवरील आठ कैदी फरार
By admin | Published: June 15, 2015 1:32 AM