शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

आठशे किलोच्या काचा अंगावर पडून नाशकात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:06 PM

हुजैफाभाई पत्रावाला यांच्या मालकीचे ग्लास मेकर्सच्या दुकानात काम करणारा साबीरअली हा युवक नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानकपणे जाड काचांचे तीस ते चाळीस शिट खाली कोसळले. यामुळे तो कामगार दाबला गेला.

ठळक मुद्देकाचेचा जबर मार छाती व पोटाला लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते

नाशिक : रुग्णालये व कार्यालयांमध्ये फर्निचरच्या कामांतर्गत वापरल्या जाणाऱ्या जाड काचांचे सुमारे ४० शिट गुरुवारी (दि.१९) सारडा सर्कल परिसरातील एका दुकानामध्ये कामगाराच्या अंगावर कोसळले. या शीटच्या सुमारे आठशे किलो वजनाखाली दबलेल्या तरुण कामगाराला तासाभराच्या ‘रेस्क्यू आॅपरेशन’नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले; मात्र उपचारादरम्यान पावणेआठ वाजेच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.याबाबत सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, जुने नाशिकमधील सारडासर्कल परिसरात विविध फॅब्रिकेशन व ग्लास मेकर्सची दुकाने आहेत. या भागात असलेल्या हुजैफाभाई पत्रावाला यांच्या मालकीचे ग्लास मेकर्सच्या दुकानात काम करणारा साबीरअली हा युवक नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानकपणे जाड काचांचे तीस ते चाळीस शिट खाली कोसळले. यामुळे तो कामगार दाबला गेला. परिसरातील व्यावसायिक व कामगारांना सदर प्रकार लक्षात आल्यानंतर एकच धावपळ उडाली. मोठ्या संख्येने अखंड काचांच्या शिटखाली अडकलेल्या युवकाला बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रत्यक्षदर्शींकडून तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. जवानांनी तत्काळ दुकानामध्ये प्रवेश करून गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशनला दुपारी साडेतीन ३.३० वाजेच्या सुमारास सुरुवात केली. पत्र्याचे दुकान आणि जमलेली गर्दी व फुटलेल्या काचांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. लिफ्टिंग बॅगा कोसळलेल्या काचांच्या ढिगाखाली ठेवून जवानांनी त्यामध्ये गॅस भरण्यास सुरुवात केली. यामुळे कामगाराच्या अंगावर असलेला काचांचा भार वरच्या दिशेने उचलला गेला. जवानांनी मोठ्या कौशल्याने इलेक्ट्रॉनिक कटरचा वापर करून काचेचे शिट कापून काढले. या दुर्घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या कामगाराला सुखरूपपणे जीवंत बाहेर काढण्यास दुपारी ४.३० वाजता यश आले. शासनाच्या १०८ या आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देणाºया रुग्णवाहिकेतून त्या जखमी कामगाराला उपचारार्थ रुग्णालयात त्वरित हलविण्यात आले. मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. काचेचा जबर मार छाती व पोटाला लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साबीरअली हा मुळ उत्तरप्रेदश येथील रहिवासी असून तो मागील काही महिन्यांपासून जुन्या नाशकात वास्तव्यास होता. हुजैफा पत्रावाला यांच्या काचेच्या गुदामामध्ये तो मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवित होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकfireआगAccidentअपघात