वावी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना गावात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाबाबत आवाहन केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी केलेल्या आवाहनाला गणेश मंडळाच्या र्कायकर्ते व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यावर्षी २७ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना अंमलात आणली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सिन्नर तालुक्यात गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथरे, वावी, नांदूरशिंगोटे व परिसरात गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. सुमारे २७ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ स्थापन करून कोरोनाविरोधाच्या लढ्याला बळ दिले.
--
ग्रामसुरक्षा दलाच्या कामगिरीचे कौतुक
सहाय्यक पोलीस निरीक्षक कोते यांनी वावी पोलीस स्टेशन येथे ग्रामरक्षक सदस्यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत ग्रामरक्षकांना रात्रीच्या वेळी गावात गस्त करताना येणाऱ्या अडचणी प्रामुख्याने समजावून घेतल्या. त्यांच्यामुळे होत असलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
------------------
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते. समवेत मंडळाचे पदाधिकारी. (१५ सिन्नर २)
150921\15nsk_20_15092021_13.jpg
१५ सिन्नर २