त्र्यंबकेश्वर : श्रावणातील अखेरच्या सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन आणि शेवटच्या पाच दिवसांची दर्शनाची संधी घेण्याकरिता भाविकांचा लोंढा त्र्यंबकेश्वरी वाढत आहे. रविवारी सायंकाळनंतर भाविकांची प्रचंड गर्दी वाढली होती. सोमवारी सोमप्रदोष असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, चौथ्या सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकनगरी व सर्व यंत्रणा सज्ज आहेत. श्रावणात भगवान शंकराचे दर्शन व उपासना करणे शुभदायक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येत्या १ सप्टेंबरला श्रावणाचे उपवास सुटणार आहेत, तर काही मंडळी चतुर्मास संपल्यावर उपवास सोडतील. दरम्यान, अजा एकादशीनिमित्तही त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी तिसऱ्या श्रावणी सोमवारपेक्षा जास्त आहे. सध्या गणेशोत्सवाची तयारी, त्यात चौथा सोमवार व अजा एकादशीनिमित्त दुसऱ्या श्रावणी सोमवारप्रमाणे भाविकांनी गर्दी केली. आज विशेष करून फेरीकरिता भाविकांची गर्दी नव्हती पण कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी प्रचंड गर्दी केली होती, तर त्र्यंबकेश्वर मंदिरातदेखील भाविकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)
एकादशी, सोमप्रदोषचा साधला मुहूर्त
By admin | Published: August 29, 2016 12:27 AM