उमराणे : गाव व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आल्याचे वास्तव वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचायतच्या स्वमालकीच्या ट्रक्टरवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु केल्याने या वस्तींवरील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. उमराणे गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी पाणीपुरवठा करणार्या परसुल धरणातील पाणी गेल्या एक मिहन्यापासून आटल्याने गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांवर होणारा पाणीपुरवठा पुर्णत: विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत गावासाठी परसुल धरणातील मृत साठ्यातील साठवणुक केलेले तसेच प्रशासनाकडुन रामेश्वर धरणातुन व महालपाटणे येथील अधिग्रहित केलेल्या विहिरीतुन तिन ट्करद्वारे पाणी साठवून तब्बल दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत असतानाच मात्र वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावास्तव चित्र निर्माण झाले आहे.शिवाय वाड्यावस्त्यांवरील कुपनलीका बंद पडल्या असुन पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभातील पाणी आटल्याने तेथील परिस्थीतीत भयानक झाली आहे. प्रशासनाने येथील पाणीटंचाई दुर करण्यासाठी टॅकरची संख्या वाढवुन पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांसह महिलांनी केली होती. तालुका प्रशासनाकडुन सदर मागणीचा विचार सुरु आहे. परंतु स्थानिक परिस्थिती गंभीर असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या वृत्ताची दखल घेऊन स्वमालकीच्या टॅक्टरवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांसह महिलांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
एकलव्य आदिवासी वस्तीवर पोहचला टॅँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 6:53 PM