मालेगाव : तालुक्यातील प्रस्तावित योजना व प्रकल्पांची सर्व विभागांकडून माहिती घेऊन तसा अहवाल तयार करा. या सर्व कामांचा मंत्रालयस्तरावर आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक घेऊन पाठपुरावा केला जाईल. असे आश्वासन माजीमंत्री तथा भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी दिले आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीने वैयक्तीक निवेदने देखील पक्षाच्या तालुकाध्यक्षांकडे द्यावीत अशी सूचना त्यांनी केली. खडसे शुक्रवारी (दि.२) शेतकरी मेळाव्यासाठी मालेगावच्या दौºयावर होते. या दरम्यान त्यांनी येथील साठफूटीरोडवरील भाजप तालुका कार्यालयाला भेट देऊन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या प्रसंगी त्यांनी पक्षाच्या कामकाजाचा देखील आढावा घेतला. खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्टÑातुन केंद्रात भाजप खासदारांची संख्या पाहता त्या तुलनेत या भागातुन विधीमंडळ सदस्यांची संख्या खुप कमी आहे. त्यामुळे सन २०१९ च्या निवडणुका नजरेत ठेवून काम करावे लागणार आहे.राज्य व केंद्र शासनाच्या जनसामान्यांसाठी विविध योजना आहेत. परंतु शासकीय यंत्रणेच्या माध्यमातुन त्या जनतेपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेत कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्याची गरज आहे. शासन दरबारी प्रस्तावित योजनांचा अहवाल सादर करा. या योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे नियोजन केले जाईल असे आश्वासन खडसे यांनी दिले. तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष बाळासाहेब देसले, दीपक देसले, कैलास शर्मा यांनी खडसे यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. बैठकीला पक्षाचे विस्तारक सुनील पाटील, सुरेश निकम, पोपटराव लोंढे, हरिप्रसाद गुप्ता, नितीन पोफळे, भरत पोफळे, डोंगरसिंग ठोके, कापुरसिंग देवरे, काका पवार आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्तावित योजना, प्रकल्पांचा आढावा घेऊ एकनाथ खडसे : मालेगाव तालुका भाजपा कार्यालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:57 PM
मालेगाव : तालुक्यातील प्रस्तावित योजना व प्रकल्पांची सर्व विभागांकडून माहिती घेऊन तसा अहवाल तयार करा.
ठळक मुद्देवैयक्तीक निवेदने पक्षाच्या तालुकाध्यक्षांकडे द्यावीतविधीमंडळ सदस्यांची संख्या खुप कमी आहे