शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

एकनाथ खडसे यांची ‘लाचलुचपत’कडून चौकशी पाऊण तास हजेरी : चौकशीबाबत गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:20 AM

नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़

ठळक मुद्देदुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरीचौकशीसाठी खडसेंकडून कागदपत्रांची मागणी केली

नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन प्रकरणासह अपसंपदेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आरोपांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे़ याबाबत खडसे यांनी मंगळवारी (दि़ १०) दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे पाऊण तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवल्याने यासंदर्भातील गूढ वाढले आहे. गतवर्षी २० सप्टेंबर २०१७ रोजी खडसे यांची अशीच सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली होती़ माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणाबाबत प्रारंभी अनभिज्ञता दाखवून या व्यवहाराचे पैसे आपण दिले नसल्याचा पवित्रा घेतला होता़ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर खडसेंच्या बँक व्यवहाराची माहिती जाहीर करून न्यायालयात तक्रारही केली होती़ न्यायालयाने खडसेंविरुद्ध चौकशी करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर ताशेरे ओढले होते़ नाशिक लाचलुचपत विभागाकडून खडसेंच्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेली मालमत्ता, आयकर विभागागील माहिती यांची तपासणी सुरू आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी आरोपांच्या चौकशीसाठी खडसेंकडून कागदपत्रांची मागणी केली होती़ खडसे यांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही अडचणी असल्याने त्यांना खुलासावजा चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते़ या कागदपत्रांचा नव्याने अभ्यास केल्यानंतर खडसेंना चौकशीसाठी पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे़ मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास खडसे लाचलुचपत विभागात चौकशीसाठी आल्यानंतर साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांची चौकशी पूर्ण झाली़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती विचारली असता त्यांनी सोयीस्करपणे मौन बाळगले़चौकशी कोणाची याचीच चर्चामाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे़ त्यानुसार खडसे यांची मंगळवारी (दि़१०) सुमारे पाऊण तास चौकशी करण्यात आली़ मात्र, चौकशी नेमकी कशाबाबत केली याबाबत माहिती देण्यास एसीबीच्या अधिकाºयांनी नकार दिला़ सहा महिन्यांपूर्वी खडसेंची चौकशी करण्यात आली त्यावेळीही उगले यांनी ‘नो कॉमेंट’ म्हणत माहिती दिली नव्हती़ त्यामुळे लाचलुचपत विभाग खडसेंची चौकशी करतो की खडसेच लाचलुचपत विभागाचा कारभार सुरळीत सुरू आहे की नाही याची चौकशी करतात, अशी चर्चा आहे़