नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर होऊन दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतिश छगन भोईर (४०) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित अशोककुमार कुंदणलाल भाटीया यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अतिश यांच्या फिर्यादीनुसार लसीकरण केंद्रावर कर्तव्य बजावत असताना सायंकाळी साडे चारच्या सुमारास संशयित भाटीया व एक महिला व ३० ते ३५ वयोगटातील तरुणासह केंद्रावर आले. त्यांनी लस घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत आरोग्य सेतु ॲपवरील मेसेज दाखिवला. ‘आजचे दिवसभरातील लसीकरण पुर्ण झाले आहे, त्यामुळे तुम्ही उद्या या’ असे फिर्यादी आतीश यांनी सांगितले. त्यामुळे संशयित भाटीया संतापले आणि शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. ‘मला आताच लस द्या...’असा आग्रह धरला. यावेळी ‘वरिष्ठांनी परवानगी दिल्यास आम्ही लस देऊ’असे अतिश यांनी सांगितल्यानंतर ज्येष्ठ नागरिकासोबत असलेल्या युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्यास विरोध केला असता ज्येष्ठ नागरिकाने अतिश यांचा हात पिरगाळला तसेच अरेरावी करीत गोंधळ घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, वैद्यकीय चाचणी केली असता बोटाचे हाड मोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अतिश यांनी भाटीया विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
जिल्हा रुग्णालयात वृद्धाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 2:08 AM
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर होऊन दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकर्मचाऱ्याचे बोट फ्रॅक्चर : पोलिसांकडून गुन्हा दाखल