नाशिक : निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठेवता येणार आहे.आयोगाने सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे मोबाइल अॅप नागरिकांना केवळ निवडणूक काळासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार या अॅपद्वारे केल्यास अवघ्या १०० मिनिटांत संबंधितावर कारवाई होऊ शकते. आयोगाने सर्वसामान्यांना निवडणुकीच्या सर्व घटनांवर नजर ठेवण्याचा अधिकारच या अॅपद्वारे बहाल केला आहे.यापूर्वी आचारसंहितेची तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारीची सत्यता तपासून पाहून त्यानंतर कार्यवाहीची प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा वेळ वाया जात होताच शिवाय आचारसंहिता भंग असल्याबाबतचे मतप्रवाहदेखील उमटत होते.
निवडणूक आयोगाचे सिटिझन व्हिजिलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:29 PM