नाशिक : सन २०१९ मध्ये होणारी लोकसभा व विधानसभेची निवडणूक सर्वार्थाने वेगळी राहणार असून, समाजमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, निवडणूक प्रक्रियेतील बदल, जनजागृतीसाठी निवडणूक आयोगदेखील सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचे सोमवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी सांगितले. नाशिक विभागाने निवडणुकीची जय्यत तयारी केल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केल्यावर अधिकाऱ्यांना हायसे वाटले. अश्वनीकुमार यांच्या उपस्थितीत सोमवारी नाशिक विभागाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी अश्वनीकुमार यांच्या राज्यातील अन्य जिल्ह्णांतील बैठका अनेकार्थाने चर्चेत आल्यामुळे नाशिकच्या बैठकीविषयी सर्वांनीच धास्ती घेतली होती, परिणामी सुटीच्या दिवशीही जिल्हाधिकाºयांकडून बैठकावर बैठकांचा सपाटा लावण्यात आला होता. सोमवारी सकाळी दहा वाजता नाशिकरोड विभागीय कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. त्यात मतदार यादीचे अद्ययावतीकरण, मतदारांची छायाचित्रे, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर याबाबत अश्वनीकुमार यांनी अनेक अधिकाºयांना उलट-सुलट प्रश्न विचारले. अश्वनीकुमार यांच्याप्रमाणेच विभागातील निवडणूक अधिकाºयांनीही तितकीच तयारी केलेली असल्यामुळे ही बैठक समाधानकारक पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी निवडणूक वेगळी राहणार असून, त्यात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढावी, निवडणूक कायद्यातील फेरबदल, जनजागृतीसाठी आयोग सोशल मीडियाच्या माध्यमातील फेसबुक, व्टिटर, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअॅपचा वापर केला जाणार आहे.मतदार, निवडणूक अधिकारी, माध्यमे यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्णात नोडल अधिकाºयांची नेमणूक करण्यात येणार असून, सदरचा अधिकारी हा राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे आयोगाची बाजू तसेच मतदारांचे शंका निरसन करेल, असेही त्यांनी सांगितले.दुपारी साडेचार वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत अधिकाºयांनीही विचारलेल्या प्रश्नांचे शंका निरसन करण्यात आले. नाशिक विभागाने केलेल्या तयारीबद्दल व नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांच्या तयारीबद्दल त्यांनी कौतुक केले. या बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, निवडणूक उपायुक्त वळवी यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.तक्रारीची तत्काळ दखल घेणारच्प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात ‘सी-व्हिजील’ नावाची प्रणाली वापरण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रक्रियेत, उमेदवारांच्या प्रचारात गैरप्रकार आढळल्यास मतदार थेट या अॅपच्या माध्यमातून आयोगाकडे तक्रार तसेच ध्वनिचित्रफीत टाकू शकतील. त्याची तत्काळ संबंधित निवडणूक अधिकारी दखल घेऊन कार्यवाही करतील, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग ‘सोशल’ मीडियाचा करणार वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 1:23 AM