नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी संचालकांची बैठक बोलाविली असून, माजी सभापती देविदास पिंगळे यांचे नाव सभापती पदासाठी जवळ जवळ निश्चित झाले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच वर्षपूर्वी झालेल्या निवडणुकीत पिंगळे गटाला बहुमत मिळाले होते व सभापतीपदी पिंगळे यांचीच निवड झाली होती. बाजार समितीच्या भरण्याची रक्कम घरी नेल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केल्याने पिंगळे पायउतार झाले, परिणामी विरोधी चुंबळे यांनी बाजार समिती वर कब्जा केला होता. मात्र काही दिवसातच चुंबळे यांना लाच घेताना पकडण्यात आल्याने त्यांनाही सभापती पद सोडावे लागले. त्यानंतर सकाळे यांना राजीनामा द्यावा लागला.
नाशिक बाजार समिती सभापतीची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 1:25 AM