नाशिक : येत्या सप्टेंबरमध्ये आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात साधारणपणे १० ते १२ तारखेला विधिमंडळाच्या निवडणुका होतील, अशी शक्यता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली. मागील पंचवार्षिकची निवडणूक आॅक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात झाली होती. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी ढोबळ शक्यता आपण वर्तविल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.नाशिक जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा बैठकीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. त्यांनी राज्य शासनाचा जिल्ह्याचा हा अखेरचा आढावा असल्याचे सांगताना अनेक कामांचा या ठिकाणी आढावा घेण्यात आल्याचे सांगितले. बैठकीदरम्यान महाजन यांनी तारखांसह आचारसंहिता आणि निवडणुकीची शक्यता वर्तविल्याने त्यांना विचारले असता ही निव्वळ शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.मागील पंचवार्षिक निवडणूक ही आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या-दुसºया आठवड्यातच झाली होती त्यामुळे दहा-बारा दिवस मागे-पुढे झाले तरी निवडणूक ही आॅक्टोबर महिन्यात आणि त्याच्या तीस दिवस अगोदर आचारसंहिता म्हणजे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते.निवडणुकीविषयीचे हे कोणतेही भाकीत अथवा भविष्य वर्तविलेले नाही तर साधारणपणे मागील निवडणुकीचा अंदाज घेऊन आपण असे व्यक्तव्य केल्याचे महाजन यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कातकॉँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री आघाडीचा असेल असे विधान केल्याप्रकरणी महाजन यांना विचारले असता आघाडीने ५० आमदार तरी निवडून दाखवावेत, असे आव्हानच महाजन यांनी आघाडीला दिले. आगामी निवडणुकीनंतर विरोधी बाकावर बसायला पुरेसे आमदारही आघाडीकडे राहणार नसल्याचे विधान महाजन यांनी यावेळी केले. दरम्यान, कॉँग्रेस-राष्टÑवादीतील पहिल्या फळीतील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाकडे येण्याचा अनेकांचा ओढा असून ते भाजपाकडे डोळे लावून बसल्याचेही महाजन म्हणाले.
आॅक्टोबरच्या १० किंवा १२ तारखेला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 2:18 AM
येत्या सप्टेंबरमध्ये आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात साधारणपणे १० ते १२ तारखेला विधिमंडळाच्या निवडणुका होतील, अशी शक्यता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली. मागील पंचवार्षिकची निवडणूक आॅक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात झाली होती. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी ढोबळ शक्यता आपण वर्तविल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
ठळक मुद्देगिरीश महाजन; आघाडीचे ५० आमदारही नसतील