ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.गुरुवारी (दि.२४) माघारीची अंतिम मुदत होती. सोसायटीच्या तेरा जागांसाठी ३० उमेदवारांनी आपले नामांकनपत्र दाखल केले होते. माघारीच्या अंतिम दिवसाअखेर १७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सर्वच्या सर्व १३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.निवडून आलेले उमेदवार जनरल गटातून - दतू सोनू देसाई, मधुकर निंबा देशमुख.इतर मागास वर्ग गटातून -अशोक पंडित मोरे.अनुसूचित जातीमधून - वसंत काळू पवार.भटक्या जमाती गटातून - शरदसिंग उमरावसिंग परदेशी.आदिवासी महिला गटातून - नंदाबाई दौलत चव्हाण, मंजुळाबाई मोतीराम गायकवाड.आदिवासी कर्जदार गटातून - नामदेव रतन बंगाळ, कांतिलाल रामचंद्र गायकवाड, काशिनाथ रामा गावित, बापू पंडित चौधरी, बळीराम सोमा गायकवाड, पांडुरंग वामन खिलारी हे निवडून आलेले आहेत.ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जि.प. माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे यांनी मार्गदर्शन केले, तर मंगेश देसाई, अशोक मोरे, भाऊसाहेब मोरे, युवराज मोरे, अशोक देशमुख, निंबा मोरे, ललित मोरे, सुभाष सोनवणे, दादा मोरे, दीपक अहिरे, ज्ञानेश्वर पवार, दीपक माळी, देवा भुजाडे, देवा मोरे, मुरलीधर ठाकरे, कांतिलाल ठाकरे, बाबू पवार, महादू आहेर, धर्मा जोपळे, धनराज ठाकरे, आनंदा भोये, कैलास पवार यांनी परिश्रम घेतले.(२४ ओतूर)ओतूर आदिवासी सोसायटी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करणारे रवींद्र देवरे, मंगेश देसाई, अशोक देशमुख, भाऊसाहेब मोरे, युवराज मोरे, ज्ञानेशवर पवार, काशिनाथ गावित, वसंत पवार.
ओतूर आदिवासी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 8:31 PM
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.