त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी (नाशिक) व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या मंगळवारी (दि. १५) निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार दीपक गिरासे काढणार आहेत.एप्रिल ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जाहीर करण्यात आला आहे. त्यादृष्टीने तहसीलदार कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक कक्षाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. दि. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत (दि. २५ ते २७ हे तीन दिवस वगळता) सकाळी ११ ते ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे,दि. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, दि. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, याचदिवशी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.५० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अंतिम अधिसूचना दि. १९ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्र्यंबकमधील तीन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:41 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी (नाशिक) व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या मंगळवारी (दि. १५) निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार दीपक गिरासे काढणार आहेत.
ठळक मुद्दे येत्या मंगळवारी (दि. १५) निवडणुकीची अधिसूचना