निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाबुराव रिकामे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र जाधव, लिपिक मोतीराम भावनाथ यांनी ही प्रक्रिया पार पाडली. सरपंचपदासाठी परिवर्तन पॅनल व विकास पॅनलने उमेदवार उभे केेले होते. परिवर्तन पॅनलच्या जानकाबाई चव्हाण यांच्यात व विकास पॅनलच्या गायत्री थोरात यांच्यात लढत होऊन दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. विल्होळी ग्रामपंचायतची सदस्य संख्या १५ असून, नवनाथ गाडेकर दोन्ही ठिकाणी निवडून आल्याने एका ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. समान मते पडल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढली असता जानकाबाई चव्हाण यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली व त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. उपसरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलचे भास्कर थोरात व विकास पॅनलचे संजय गायकवाड यांच्यामध्ये निवडणूक होऊन भास्कर थोरात यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य विष्णू घेळ, नवनाथ गाडेकर, चंद्रभागा कदम, सुरेखा थोरात, सुजाता रूपवते, बाजीराव गायकवाड, संजय गायकवाड, समाधान आल्हाट, निशा गाडेकर, जयश्री आंडे, शोभा वाघ, गायत्री थोरात सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मनोहर भावनाथ, भास्कर थोरात, सुरेश भावनाथ, पुंजा निंबेकर, ज्ञानेश्वर भावनाथ, बबन गायकवाड, शिवाजी चव्हाण, पोलीस पाटील संजय चव्हाण, भाऊसाहेब भावनाथ, बंडूनाना चव्हाण, बाबुराव रूपवते, बाळू भावनाथ आदी उपस्थित होते.
(फोटो १५ विल्होळी)