नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी मतदान यंत्रे तसेच व्हीव्हीपॅट मशीन्स दाखल झालेल्या असून, अंबड येथील सेंट्रल वेअरहाउस येथे मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली आहेत. निवडणूक कामाची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून येथे निवडणूकपूर्व कामाला लागले आहेत.विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि विनातक्रार होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान कर्मचाºयांची तत्परता या जोरावर नाशिक जिल्ह्याने निवडणुकीच्या कामात आघाडी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची काही यंत्रे दाखल झाली आहेत. या यंत्रणांसाठी लागणाºया पूरक साहित्यांची जमवाजमवदेखील करण्यातआलेली आहे. अंबड येथे सध्या या यंत्रांसंदर्भात कर्मचाºयांना काही सूचना आणि मार्गदर्शन केले जात आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे यादीतील दुबार आणि मयत नावे शोधण्यास मोठ्या प्रमाणात यश आले आणि सुमारे ५५ हजारपेक्षा अधिक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे मतदारयादी पारदर्शक होण्यास मदत झाली असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी या मोहिमा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.मतदान जनजागृतीमतदार जनजागृती मोहिमेत सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांनाही बरोबर घेऊन जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीचा वेळोवेळी घेतलेला आढावा तसेच निवडणूक कर्मचाºयांवर सोपविलेल्या कामांचेदेखील मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विधानसभेची मोठी तयारी निवडणूक शाखेने केलेली आहे. त्यामुळे निवडणूक कधीही जाहीर झाली तरी जिल्हा निवडणूक शाखेची तयारी आघाडीवर असणार आहे.
सुटीच्या दिवशीही निवडणुकीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:32 AM