घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३४ महत्वपूर्ण ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (ीद.२४) घोषित करण्यात आला. युवकांच्या लक्षणीय सहभागाने रंगतदार झालेली ही निवडणूक युवकांच्या हाती सत्ता सोपवणारी ठरली.जिल्ह्याची अर्थवाहिनी असणारी घोटी बुद्रुक, औद्योगिक वसाहत असणारी गोंदे दुमाला, वाडीवर्हे, माणकिखांब, सांजेगाव, बेलगाव तर्हाळे, टाकेद बुद्रुक, घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. महत्वाच्या गावांच्या सरपंच पदाच्या लक्ष्यवेधी निकालांनी अनेक गावांत जल्लोष करण्यात आला. अपेक्षेपेक्षा जास्तच अनपेक्षति निकाल लागल्याने प्रस्थापितांच्या साम्राज्याला खिंडार पडल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले.काळूस्ते ग्रामपंचायतीत अनिरु द्ध घारे, गंगू घारे या उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने अनिरु द्ध घारे ह्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक, गोंदे दुमाला, वाडीवर्हे, माणिकखांब, सांजेगाव, काळूस्ते, साकुर, कुºहेगाव, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द, नांदगाव बुद्रुक, टाकेद बुद्रुक, खेड भैरव, खंबाळे, भरवीर खुर्द, वाघेरे, शेणीत, मुकणे, पिंपळगाव घाडगा, निनावी, बेलगाव तर्हाळे, तळोशी, टाकेद खुर्द, मानवेढे, कुरुंगवाडी, त्रिंगलवाडी, आवळखेड, वाळविहीर, अडसरे बुद्रुक, पिंप्री सद्रोद्धीन, आंबेवाडी, भावली खुर्द, बोर्ली ह्या ग्रामपंचायतींच्या ३४ थेट सरपंच, २३६ सदस्यपदाच्या जागेसाठी सोमवारी मतमोजणी झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 7:18 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३४ महत्वपूर्ण ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (ीद.२४) घोषित करण्यात आला. युवकांच्या लक्षणीय सहभागाने रंगतदार झालेली ही निवडणूक युवकांच्या हाती सत्ता सोपवणारी ठरली.
ठळक मुद्देघोटी : लक्ष्यवेधी निकालांनी प्रस्थापितांच्या साम्राज्याला पाडले खिंडार