शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:01 AM

महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, वर्षभर भाजपाला साथ देणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, वर्षभर भाजपाला साथ देणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असून, पक्षाचे सहयोगी सदस्य अपक्ष मुशीर सय्यद यांना तसा व्हीप बजावण्यात येणार आहे. मुशीर सय्यद यांनी ठरलेल्या करारनाम्यानुसार स्थायीच्या सदस्यत्वाचा राजीनामा न दिल्याने मुशीर सय्यद नेमके कोणाच्या गोटात जातात, याकडे लक्ष लागून असणार आहे. महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी सकाळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. सभापतिपदासाठी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांना, तर शिवसेनेकडून संगीता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीवर भाजपाचे सर्वाधिक ९, शिवसेनेचे ४, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचा प्रत्येकी १ तसेच मनसेच्या कोट्यातून अपक्ष १ असे बलाबल आहे. समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड जवळपास निश्चित आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला कॉँग्रेस-राष्टÑवादीने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. सेनेचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी मनसेचे कुणीही पदाधिकारी अथवा नगरसेवक उपस्थित नसल्याने मनसेच्या पाठिंब्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु, मनसेचे गटनेता सलीम शेख, शहराध्यक्ष अनिल मटाले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांची बैठक होऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिल्याने भाजपाने आरोग्य समितीच्या उपसभापतिपदी मनसेचे योगेश शेवरे यांची वर्णी लावली होती. परंतु, मनसेने आता स्थायीच्या सभापतिपदासाठी सेनेची पाठराखण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, मनसेच्या कोट्यातून स्थायीवर गेलेले सदस्य मुशीर सय्यद यांच्या घरी तसेच कार्यालयात व्हीप बजावण्यात आला असून, शनिवारी (दि. १७) सभागृहातही प्रत्यक्ष व्हीप बजावला जाणार असल्याची माहिती गटनेता सलीम शेख यांनी दिली आहे. मात्र, मुशीर सय्यद सभागृहात कोणती भूमिका निभावतात, याकडे लक्ष लागून आहे. त्यांनी भाजपाला साथ दिल्यास विरोधकांचे संख्याबळ ६ वर येणार आहे.भाजपा सदस्य सहलीवरस्थायी समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या भाजपाच्या नऊ सदस्यांना शुक्रवारी मुंबईजवळील फार्महाउसवर नेण्यात आल्याचे समजते. उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले सभागृहनेता दिनकर पाटील तसेच उद्धव निमसे यांनाही सोबत नेण्यात आले आहे. शनिवारी सकाळी मतदानाच्या वेळेसच त्यांना नाशिकला आणले जाणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी करण्यात आली असून, आवश्यक तो पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक