वैतरणानगर : येथील इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्युुत निरीक्षक भागवत उगले यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक अभियंता राजेश परदेशी, अमित नारखेडे, मुख्याध्यापक एल जी गोसावी, आरोग्यसेवक सचिन धारणकर आदी उपस्थित होते. यावेळी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुरक्षेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सूत्रसंचालन अमोल ढेरिंगे यांनी केले. यावेळी एस डी पवार, व्ही. के. चव्हाण, योगेश वाघ, सोनवणे आदी उपस्थित होते.
वैतरणा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 9:57 PM