नांदगाव : महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याकडून ४०,००० रु.ची लाच स्वीकारताना त्यांचेच वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार रमेशचंद्र (४६) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांदगाव येथील वीज उपकेंद्रात सकाळी १२.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कारवाई केली. सहाय्यक अभियंता या महिला आहेत.जळगाव बु. येथील रोहित्र स्थलांतर प्रकरणी निलंबन करण्याची कारवाई करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे न पाठविण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी ५०,००० रु. च्या लाचेची मागणी लोकसेवक शैलेशकुमार रमेशचंद्र यांनी सहायक अभियंता महिलेकडे केली होती. अशी लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांनी केली होती. त्यापैकी ४०,००० रु. घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या कार्यक्षेत्रातील जळगाव बु. येथील विद्युत मंडळाच्या रोहित्राची जागा बदलविण्यासाठी जळगाव बु.च्या काही शेतकºयांनी विद्युत महामंडळाची पूर्वपरवानगी न घेता रोहित्र स्थलांतरित केल्याने या शेतकºयांविरोधात नांदगाव ग्रामीणचे मदतनीस सुनील गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सहाय्यक अभियंता यांचा निलंबन कसुरी अहवाल न पाठविण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी लाचेची मागणी केली होती. पंच साक्षीदारा समवेत शैलेशकुमार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक पवन देसले व महेश भोरतेकर, नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवी, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, संदीप सरग, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, सुधीर सोनवणे, संदीप कदम आदींनी कारवाईत भाग घेतला.
वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:40 AM
नांदगाव : महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याकडून ४०,००० रु.ची लाच स्वीकारताना त्यांचेच वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार रमेशचंद्र (४६) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांदगाव येथील वीज उपकेंद्रात सकाळी १२.३० वाजेदरम्यान ही घटना घडली.
ठळक मुद्देनांदगाव येथील वीज उपकेंद्रात सकाळी ही घटना घडली. नांदगाव ग्रामीणचे मदतनीस सुनील गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला