शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

विजेअभावी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:33 PM

वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपांगरी : पिकांना पाणी देण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची मागणी

पांगरी : वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची म्हणजे गहू, मका तसेच जनवारांच्या चाºयाची लागवड केली आहे, परंतु पिकांना पाणी देणे शेतकºयांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण ही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोहोचण्याअगोदर वीज जाते. त्यामुळे विहीर ते वाफ्यापर्यंत शेतकरी चकरा मारून हैराण झाला आहे. पाणी भरण्यासाठी दोन व्यक्तीची गरज भासू लागली असून, एक शेतात तर दुसºयाला स्टार्टरजवळ उभे राहावे लागत आहे.सध्या शेतकºयांना शेतीसाठी रविवारी ते मंगळवार रात्री ८.०५ ते सकाळी ६.०५ वाजेपर्यंत, तर गुरुवार ते रविवार सकाळी ७.२० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत वीज असते, परंतु रात्री दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसाच्या वेळी देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. रात्री अंधारामुळे हिंस्रपशू तसेच साप, विंचू सारखे विषारी प्राण्यांच्या दहशतीखाली शेतकºयाला रात्री शेतीत पाणी भरावे लागते.शेतीसाठी दिवसाच वीज द्यावी तसेच पूर्ण दाबाने वीज देण्याची मागणी बाबासाहेब शिंदे, अशरफ कादरी, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार, प्रकाश पांगारकर, संदीप पगार, भाऊसाहेब पगार, प्रवीण शिंदे, सुनीलनिरगुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.कमी दाबाचा पुरवठा वीज उपकरणे बंदवीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक वीज उपकरणे बंद आहेत. त्यामुळे वीज असूनही उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळून नुकसान होत आहे. मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकºयाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत आहे. वीज मंडळाकडून वीजबिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीजबिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने दिली जात आहे. शेतकºयांवर हा अन्याय आहे.- संजय वारुळे, उपाध्यक्ष, विकास संस्था, पांगरीग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते, परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाउणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- आत्माराम पगार, सिन्नर तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Governmentसरकार