शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

अडीचशे शाळांना मिळणार एकाच दिवसात वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:02 AM

नाशिक : जिल्हा परिषदेच्या तब्बल २३८ शाळांना एकाच दिवसात वीजजोडणी मिळण्याची सुचिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात आदेश दिले.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या तब्बल २३८ शाळांना एकाच दिवसात वीजजोडणी मिळण्याची सुचिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात आदेश दिले.दरम्यान, यासंदर्भात १६ जुलै २०१७ च्या ‘लोकमत’मध्ये निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या ‘सारांश’ या स्तंभात मांडण्यात आलेल्या ‘डिजीटलायझेशन चांगलेच पण...’ या वस्तुस्थितीची नोंद घेत अध्यक्ष शीतल सांगळे यांनी त्यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात वीज विभागाच्या अधिकाºयांना स्वतंत्र बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ही बैठक सोमवारी (दि.११) सांगळे यांच्या कक्षात झाली. बैठकीस महाराष्टÑ वीज विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे आदी उपस्थितहोते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सुमारे २३८ प्राथमिक शाळांना अद्यापपर्यंत वीजजोडणीच नाही त्या शाळांना तत्काळ वीजजोडणी कशी करता येईल, अशी विचारणा शीतल सांगळे यांनी केली. त्यावर संबंधित शाळांनी ए-वन हे अर्ज जोडणीचे फॉर्म तत्काळ भरल्यास एका दिवसात वीज देण्याचे मुख्य अभियंता पावडे यांनी मान्य केले. त्यावर सांगळे यांनी या २३८ शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना तत्काळ हे फॉर्म एका दिवसात भरून वीजजोडणी घेण्याचे आदेश प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हसकर यांना दिले. त्यांनी हा निरोेप शाळांना दिला. मंगळवारी (दि.१२) संबंधित २३८ शाळा वीज मंडळाकडे ए-वन फॉर्म भरून देणार असून, या शाळांना एका दिवसात आता वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती अध्यक्ष सांगळे यांनी दिली.