सिडको : येथील धोकादायक असलेल्या वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिडकोतील अत्यंत गंभीर बनलेल्या वीजतारांबाबत अनेक तक्रारी आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दुसºया टप्पातील कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सिडको हा भाग धोकादायक विद्युत वाहिनीसाठी अतिशय संवेदनशील असून, विद्युततारांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच तीन व्यक्तींना दत्तचौक परिसरात विजेचा जोरदार धक्का लागून अपंगत्व आले आहे. यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सिडको भागात पाहणी दौरा करण्यात आला होता. मंत्री महोदयांनीदेखील दौºयात पाहणी करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजमितीला आनंदनगर येथील उर्दू शाळेपासून ते महाकाली मैदान तसेच त्रिमूर्ती चौक ते दत्तमंदिर स्टॉपपर्यंत आणि हेडगेवारनगर मनपा ग्राउंडजवळील भाग आदी ठिकाणच्या धोकेदायक विद्युततारा भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.पाहणी दौºयात मोरवाडी व दत्तचौक येथे पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे सीमा हिरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी गणेश ठाकूर, गोपाळ अहेर, दिनेश मोडक, संजय गामणे, मनोज बिरार, युवराज कडवे, डॉ. विनय मोगल, साईनाथ गाडे, एकनाथ नवले, चिंधू सोनवणे, अभिजित गोरे, समीर सुर्वे, दिलीप देवांग, अंकुर पानसरे, मोतीराम अनवट, राजेंद्र आव्हाड, परमानंद पाटील आदी उपस्थित होते.आमदार हिरे यांनी सोमवारी कार्यकारी अभियंता सवाईराम, शाखा अभियंता साळी, घोटेकर यांच्यासह कामांची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कावेरी घुगे, छाया देवांग, राकेश दोंदे यांच्यासमवेत प्रत्यक्ष मोरवाडी, सिंहस्थनगर, दत्तचौक, राणाप्रताप आदि भागांची पाहणी करून माहिती घेतली.
वीजतारा भूमिगत करण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:19 AM