औदांणे :औदाणे(ता.बागलाण) येथील परिसरात हत्ती नदीकाठी झाडेझुडपात मोरांचेवास्तव्य असुन सध्या उन्हाची तीव्रता व पाण्याची दुष्काळी परिस्थिती असून मुंजवाड-येथील शेतकरी व माजी उपसरपंच बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या शेतात दि.१०रोजी सकाळी दोन वर्षाचा एक नर व एक मादी असे दोन मोर पाण्याअभावी व उष्मघाताने मृतअवस्थेत आढळ्ले.परिसरातील आजूबाजूला डोंगर व गांवाजवळ हत्ती नदी असून नदी काठी सुमारे६० ते ७० मोर वास्तव्यास आहेत. मात्र उन्हाची तीव्रता व नदीकाठी पाणी नसल्याने हे मोर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पिण्यासाठी जातात व विहिरींनाही पाणी नसल्याने या मोरांना घोटभरपाण्यासाठी वणवण भटकंतीकरावी लागत आहे. सध्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे .पाण्याअभावी उष्मघाताने या मोरांचाबळी जात आहे पाचदिवसापुर्वी गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी औंदाणे येथील शेतकरी बापू खैरनार यांच्या शेतात पाणी दोन वर्षाचा मोरांचा पाण्याअभावी व उष्मघाताने मृत्युझाला. या मोरांचे मळगांव येथे सरकारी रु ग्णालयात शवविच्छेदन करु न दोधेश्वर येथील वनविभागाच्या जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी वनपाल एन.एन. गांगुर्डे वनरक्षक के.व्ही.मोहिते,पी.आर.पाटील, शितल रहीतकार ,जी.व्ही.पवार यांनी पंचनामा केला.यावेळी शेतकरी भिका पवार, बापू खैरनार ,बाळासाहेबसुर्यवंशी,बारकू पवार,सागर सुर्यवंशी,योगेश सूर्यवंशी आदी शेतकरी उपस्थित होते.(10पिकॉक)
हत्ती नदीकाठी उष्मघाताने मोर मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 5:37 PM
औदांणे : औदाणे(ता.बागलाण) येथील परिसरात हत्ती नदीकाठी झाडेझुडपात मोरांचेवास्तव्य असुन सध्या उन्हाची तीव्रता व पाण्याची दुष्काळी परिस्थिती असून मुंजवाड-येथील शेतकरी व माजी उपसरपंच बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या शेतात दि.१०रोजी सकाळी दोन वर्षाचा एक नर व एक मादी असे दोन मोर पाण्याअभावी व उष्मघाताने मृतअवस्थेत आढळ्ले.
ठळक मुद्देवन विभागाने पंचनामा करून शवविच्छेदन केले व त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.