नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन हे वर्षभरापासूनच कोविड रूग्णालय म्हणून राखीव ठेवण्यात आले होते. या रूग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे बेड असल्याने नेहमीच वेटिंग असते. महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन या रूग्णालयांवर कायम ताण असतो. या दोन्ही रूग्णालयात नाशिकच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील रूग्ण येत असतात. महापालिकेच्या या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात १५० बेडची क्षमता असताना १५७ रूग्ण दाखल होते. त्यातील १३१ रूग्णांना ऑक्सिजन लावावा लागला होता तर १४ रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. या रूग्णालयात दाखल ६३ रूग्ण गंभीर होते. मात्र, ऑक्सिजन गळतीची दुर्घटना झाल्यानंतर एकच हलकल्लोळ झाला. महापालिकेच्या कर्मचारी आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी बरीच धावपळ करून रूग्ण वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, तरीही २२ जणांचा बळी गेला. यात व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
व्हेंटिलेटवर असलेले १५ पैकी ११ रूग्ण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:15 AM