नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांची तिसºया कॅपराउंडसाठी अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात आली असून, १८ ते २० जुलैदरम्यान तिसºया कॅपराउंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेºया पूर्ण झाल्या असून, तिसºया फेरीसाठी जागा वाटपाची यादी जाहीर झाली असून, तिसºया फेरीत प्रथमच संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. तर प्रवेशप्र्रक्रियेच्या पहिल्या व दुसºया फेरीत प्रथम पसंतीची जागा फ्रीज करणाºया विद्यार्थ्यांसह तिसºया फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र व निश्चित शुल्क भरून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर ३० जुलैला शासकीय, शासन अनुदानित संस्था व विद्यापीठ विभागातील रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार असून, ३० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत संबंधित जागांसाठी प्रवेश आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे.१ आॅगस्ट २०१८ पासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे नियमित वर्ग सुरू होणार असून, १४ आॅगस्टला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या प्रवेशप्रक्रियेचा कटआॅफ जाहीर केला जाणार आहे, तर १६ आॅगस्टपर्यंत सर्व संबंधित संस्थांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर सादर करावी लागणार आहे.
अभियांत्रिकीचे अकरा हजार प्रवेश : दोन फेऱ्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:31 AM