शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

अकरा नाशिककर महावितरणला विकतात वीज

By admin | Published: October 28, 2016 12:55 AM

सौर ऊर्जेचा वाढता वापर : घरगुतीबरोबर व्यावसायिकांचाही वाढला सहभाग

 संजय पाठक  नाशिकविजेचे वाढणारे दर आणि त्यानंतरही पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनीच सौर ऊर्जेचा वापर करून घराच्या छतावर वीजनिर्मिती करणे सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी अशा प्रकारचे छतावरच वीजनिर्मिती केंद्रे सुरू झाली असून, ही वीज केवळ नागरिकच वापरत नाही तर ती महावितरणला विकतही असल्याने महावितरणाचा बोजा कमी झाला आहे. अर्थात, शासनाने हे धोरण राबविण्याचे ठरविले असले तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांपैकी अनेकांना या धोरणाविषयी पुरेशी माहिती नाही. कित्येकदा मंजुरीच्या क्लिष्टतेत ग्राहकांना इतक्या फेऱ्या माराव्या लागतात की, योजनेत सहभागी होण्याची इच्छच राहात नाही. महावितरणचे दोष काढले तर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू शकेल.नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे छतावर वीजनिर्मिती करून ती स्वत: वापरतानाच अन्य नागरिकांना देण्यासाठी ९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ११ वीज ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली असून त्यात ५ घरगुती ग्राहक आहे. सामान्यत: विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी नागरिक घराचे पाणी सौर ऊर्जेवर तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटरचा वापर करतात. त्यातून घरगुती गॅसची बचतही केली जाते. परंतु अशा प्रकारे घरासाठी वीज निर्मितीसाठी स्वयंपूर्ण होण्याबाबत शासनाचे धोरण चालू वर्षीच आखले गेले आहे. घराच्या छतावर घरगुती वापरासाठी वीजनिर्मिती करतानाच अतिरिक्त निर्माण होणारी वीज महावितरणला विकता येऊ शकते. यासंदर्भातील रूफ टॉप पॉलिसी केंद्र आणि त्यानंतर राज्य शासनाने आणली आहे. ती सर्वसामान्यांपर्यंत हळूहळू पोहचू लागली असून त्याचाच लाभ घेत नागरिक घरगुती वीजनिर्मिती करीत आहेत. या प्रकारामध्ये घरांवर सोलर पॅनल बसवले जातात. त्यानंतर त्यातून निर्माण होणारी वीज इर्न्व्हटरमध्ये जाते. त्याला नेट मीटर जोडले जाते. नेट मीटरमध्ये निर्माण होणारी वीज ग्राहकाने किती वापरली आणि अतिरिक्त ठरणारी वीज महावितरणाच्या ग्रीडला किती जोडली अशाप्रकारची नोंद घेणारी व्यवस्था आहे. त्याला नेट मीटर किंवा नक्तमापन म्हणतात. साहजिकच सकाळच्या वेळी वीज वापरतानाच सूर्यकिरणे प्रखर असल्यास अधिक वीजनिर्मिती होते, त्यावेळी घरात न वापरली जाणारी वीज थेट महावितरणाच्या रोहित्राला पाठविली जाते. सामान्यत: ग्राहकाच्या मंजूर वीजभारापेक्षा अधिक वीज निर्मितीची परवानगी दिली जात नाही. ग्राहक त्याला आवश्यक असलेली वीज वापरू शकतो. परंतु सकाळी अतिरिक्त निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्यापेक्षा थेट महावितरणलाच विकतो. ग्राहक स्वत: निर्मिती केलेली वीज जितकी वापरेल, तितका महावितरणचा भार कमी होतो. काही वीज वापरली आणि काही अतिरिक्त युनिट महावितरणला विकले तर ग्राहकाची रक्कम समायोजित केली जाते. त्यामुळे मासिक वीज बिलात फिक्स चार्जेसपेक्षा अतिरिक्त रक्कम भरावी लागत नाही. तर खूपच अतिरिक्त वीज महावितरणला दिल्यास वर्षभराचा हिशेब करून ग्राहकाला त्या विजेचा मोबदलाही दिला जातो. त्यामुळे ग्राहकाला त्याचा फायदाच होतो. पहिल्याच महिन्यात ५७ टक्के बचत४नाशिकच्या अशोका मार्गावर उद्योजक टी. एन. वर्मा यांचा बंगला आहे. मोठा बंगला असल्याने विजेचा वापर अधिक करावा लागत असे. त्यांचे मासिक बिल सुमारे साडेनऊ हजार रुपये इतके होते. त्यामुळे त्यांनी शासनाच्या धोरणाचा लाभ घेत ५ किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा उपकरण बसवले. त्यांच्या घराच्या एकूण लागणाऱ्या वीज क्षमतेच्या केवळ ६० टक्के इतकीच सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता त्यांनी केली. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे १८ आॅगस्ट रोजी ते कार्यान्वित झाले. रनिंग बिलिंग तारीख २८ असल्याने महावितरणने त्यांना चाळीस दिवसांचे बिल दिले. त्यांनी एकूण १३७८ वीज युनिट वापरले. त्यात ७९० युनिट महावितरणला दिले आणि त्यामुळे ५७ टक्के इतकी बचत झाली आहे. वर्मा यांनी यापूर्वी कॅनडातून पवनचक्की येथे आणून त्यातून सुमारे पाचशे युनिट वीज सायंकाळी सात ते नऊ या वेळात वापरून महावितरणच्या युनिटचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न केला. पवनचक्की शॉटसर्किटने जळाल्यानंतर आणि आता शासनाची नेट मीटरिंग पॉलीस आल्यानंतर त्यांनी सौर ऊर्जा निर्मितीची उदय येवले यांच्यामार्फत सोय केली आणि पहिल्याच महिन्यात ५७ टक्के वीजनिर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे त्यांना महावितरणला दिलेल्या विजेपोटी चार हजार रुपये येणे बाकी असल्याचे देयक पाठविण्यात आले आहे. सध्या आॅक्टोबर हीट असल्याने अधिक वीजनिर्मिती होत असल्याचे सांगतानाच टी. एन. वर्मा यांनी आपल्या सामान्यत: साडेनऊ हजार रुपये मासिक बिल येते. परंतु आता दोन ते अडीच हजार रुपये येईल, अशी व्यवस्था झाल्याचे ते म्हणाले. सोलर युनिटसाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च आला. इतकी रक्कम बॅँकेत ठेवली असती तरी जेमतेम आठ टक्के व्याजदराने वार्षिक चाळीस हजार रुपये मिळाले असते. मात्र त्यापेक्षा सौर ऊर्जेसाठी गुतंवणूक केल्याने बॅँकेतील मुदत ठेवीपेक्षा महिन्याला दोन हजार रुपये अधिक मिळणार आहेत, शिवाय पाच वर्षांत गुंतवलेली रक्कम परत मिळणार असल्याने शासनाच्या नव्या धोरणानुसार सौर ऊर्जानिर्मिती आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकणे सोयीचे ठरल्याचेही ते म्हणाले.