शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:51 PM

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक वेठीला : जिल्हा परिषदेकडून निधी वर्ग होत नसल्याने विद्युत जलपंप दुरुस्ती रखडल्याचे कारण

सिन्नर : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने व तो दुरुस्तीसाठी निधी नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पाणीपुरवठा समिती, पंचायत समिती प्रशासन व योजनेत समाविष्ट ग्रामपंचायती हे सर्व एकमेकांवर जबाबदारी ढकलून देण्यात धन्यता मानत असून, नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. नादुरुस्त विद्युत जलपंप दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. योजनेत वावी, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, सायाळे, मीरगाव, कहांडळवाडी, दुशिंगपूर, शहा, मिठसागरे व मलढोण या गावांचा समावेश आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून एवढा निधी उपलब्ध होत नसल्याने योजना बंद आहे.वावीसह अकरा गावांसाठी गोदावरी उजव्या कालव्यावर कोळगावमाळ शिवारात तलाव करून मजिप्राने पाणीयोजना राबविली आहे. सदर पाणीयोजना या दुष्काळी गावांसाठी वरदान ठरली आहे, मात्र थकीत वीजबिल, पाणीपट्टी वसुली, जलशुद्धीकरण केंद्राचा मेंटेनन्स व साहित्य खरेदी, वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, गळती अशा अनेक कारणांमुळे योजनेला नेहमी ग्रहण लागलेले असते. गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात असलेला ४० हॉर्सपॉवरचा विद्युत जलपंप जळाला आहे.तलावात भरपूर पाणी असूनही वावीच्या संतुलित जलकुंभापर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने योजनेतील समाविष्ट गावांना कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावात पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आपला हिश्श्याचा निधी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काचा निधीतून वर्ग केल्याचे सांगितले जात आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग न झाल्याने समितीच्या खात्यावर निधीचा खडखडाट आहे. विद्युत जलपंप दुरुस्तीला पैसे नसल्याने योजना बंद आहे. पाणी असूनही नळांना पाणी येत नसल्याने योजनेत समाविष्ट गावांतील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामपंचायतींना मिळणारा मुद्रांक शुल्कचा निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यांवर वर्ग करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. ग्रामपंचायतींच्या खात्यावरून सदर निधी कटिंग करण्यात आला आहे, मात्र जिल्हा परिषदेकडून सदर निधी पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होण्यास उशीर झाला आहे. पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर सदर निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात आपण सर्वच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या समितींचा आढावा घेणार आहे.- डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सिन्नरपाणीयोजना चांगली आहे, पण पाणीपुरवठा योजना सुरळीत चालविण्यासाठी विद्यमान कार्यकारिणी सक्षम नाही. समितीची दोन वर्षांची मुदत संपली आहे. समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याची गरज आहे. वसुलीचे कारण सांगून योजनेत समाविष्ट गावांना वेठीस धरण्यात येते. योजनेचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावा. या आधी पदरमोड करून स्वत: खिशातून पैसे घालून योजना सुरळीत चालविली जात होती. आता कोणाकडून तरी अनामत घेऊन निधी येण्याची अधिक वाट न पाहता विद्युत जलपंप तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जनतेला वेठीस धरू नये.- विजय काटे, उपसरपंच वावी व माजी अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती.‘समितीकडे निधी शिल्लक नाही. गेल्या वर्षापासून वसुली होत नाही. उधारीत साहित्य खरेदी चालू आहे. मुद्रांक शुल्कचे पैसे पंचायत समितीकडून पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग होणार होते, मात्र अद्याप ते वर्ग झाले नाही. ग्रामपंचायतींकडे वसुलीला गेल्यानंतर मुद्रांक शुल्क निधीचे पैसे पंचायत समितीकडून कपात करून घेतले असल्याचे सांगून आपल्याकडे थकबाकी नसल्याचे कारण सांगितले जाते. वसुलीचा चकरा मारून उपयोग होत नाही. पंचायत समितीत चकरा मारण्यात आल्या, पण अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. निधी नसल्याने विद्युत जलपंप दुुरस्ती करता येत नाही.- किरण घेगडमल, अध्यक्ष, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समिती.

टॅग्स :sinnar-acसिन्नरWaterपाणी