नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशात गोंधळ आॅगस्ट महिन्यांच्या अखेरपर्यंत सुरूच राहणार असून, त्यानंतरही किती विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेतून न्याय मिळेल, असा सवाल सध्या विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया दोन महिने उलटून गेले तरी अजूनही सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतीक्षा आहे.आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत पूर्ण झालेल्या चार फेऱ्यांतून १६ हजार ३४० विद्यार्थी अकरावीत दाखल झाले असून, तब्बल ११ हजार ४७४ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत पहिल्या चारही फेºयांमध्ये प्रवेशाची संधी न मिळालेल्या या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या १३ व १४ आॅगस्ट या दोन दिवसांत प्रवेशाच्या भाग एक व भाग दोन भरता येणार असून, १८ आॅगस्टला या रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. पहिल्या तिन्ही फेºयांत १३ हजार ९१२ प्रवेश झाल्यानंतर चौथ्या फेरीत दोन हजार ४२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे.
आॅगस्ट संपेपर्यंत चालणार अकरावी प्रवेशाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:28 AM