लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ६००० विद्यार्थ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, प्रवेशाला प्रारंभही झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या गुणवत्ता यादीत आलेली आहेत त्या विद्यार्थ्यांनी २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे. दुसऱ्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असून, त्यांची नावे पुढील फेरीसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. दुसऱ्या यादीत विज्ञानसाठी ७३९, वाणिज्यसाठी ६२८, तर कला शाखेसाठी ५९७ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे. पहिल्या यादीतील ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीतील महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही त्या उर्वरित जागा दुसऱ्या फेरीसाठी वर्ग झाल्याने विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती.
अकरावीची दुसरी यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:51 AM