लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रियेसाठी शहरातील सर्व माध्यमिक शाळांना ३१ मे पर्यंत माहिती पुस्तिका उपलब्ध होणार असून, २ जूनपासून विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन प्रवेश अर्जातील (भाग-१) माहिती भरून घेतली जाणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच केंद्रीभूत आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने शहरातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न ५७ कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे २४ हजार जागांसाठी दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी प्रवेशप्रक्रि येस प्रारंभ होत आहे. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश यंदा प्रथमच आॅनलाइन भरले जाणार असल्याने प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून, वेळोवेळी मुख्याध्यापकांच्या बैठकांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले जात आहे. याच शृंखलेतील बैठक शुक्रवारी (दि. २६) रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येविषयी माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्रवेश-प्रक्रि येचे समन्वयक एस. जी. आवारी, आर. जी. जाधव, सहायक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, उपशिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक, सुनीता धनगर, ए. एम. बागुल, के. डी. मोरे उपस्थित होते. वैभव सरोदे यांनी संगणकीय चित्रफितीद्वारे आॅनलाइन प्रवेशाविषयी सविस्तर माहिती दिली.अकरावीची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार असून, विद्यार्थ्यांना खासगी क्लासेस अथवा सायबर कॅफेतून प्रवेश अर्ज भरता येणार नसून आपल्या शाळेतूनच आॅनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात (दि. २ जून) माध्यमिक शाळेतून अर्जाचा भाग-१भरावा लागेल. यात विद्यार्थ्यांचे नाव, गाव, मोबाइल क्र मांक, ई-मेल, आरक्षण आदी प्राथमिक माहिती भरून घेतली जाणार आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढता येणार आहे. विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत हा अर्ज भरण्याची मुदत मिळणार आहे. दहावीचा आॅनलाइन निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत प्रवेश अर्जातील भाग-२ पूर्ण केला जाईल. यात विद्या शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्र म नोंदविता येणार आहे. प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती पुस्तिका शाळांना ३१ मे पूर्वी उपलब्ध होणार आहे. शहरातील सर्व माध्यमिक शाळांना दि. ३० मे रोजी शालिमारजवळील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातून माहिती पुस्तिका मिळणार आहेत. या माहिती पुस्तिका मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे हॉल तिकीट दाखविणे बंधनकारक असणार आहे.
अकरावी प्रवेशप्रक्रिया २ जूनपासून
By admin | Published: May 27, 2017 12:27 AM