नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार विरोधात रोष निर्माण झालेला असून, तो व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस, समता परिषद वा तत्सम संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र न येता, निव्वळ भुजबळ समर्थम म्हणवून घेणा-या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने येत्या २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील संदेश सोशल मिडीयावर बुधवारी सका ळपासून व्हायरल केला जात असून, त्या संदेशाखाली कोणाही व्यक्ती, पक्ष, संघटनेचे नाव नसून फक्त भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनी तो झपाट्याने पसरवला आहे. महाराष्टÑ सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खाते तसेच अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला असून, गेल्या २१ महिन्यांपासून भुजबळ तुरूंगात आहेत. त्यांच्या विरोधातील तपास पुर्ण होऊन मालमत्ताही जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचे कलम ४५ अवैध ठरविल्याने भुजबळ यांना जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात करण्यात आलेला अर्ज अलिकडेच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सरकार भुजबळ यांना सुडबुद्धीने तुरूंगात अडकवून ठेवत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होऊन गेल्या चार दिवसांपासून समर्थक कार्यकर्ते एकत्र येवून सरकारविरोधात रोष व्यक्त करू लागले आहेत. मोर्चा, निदर्शने, धरणे, रास्तारोको अशा प्रकारचे आंदोलने करण्याची तयारी राज्यभर सुरू झाल्याने तसे करण्यापेक्षा संपुर्ण राज्यात एकाच प्रकारचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यावे असाही मतप्रवाह पुढे आला व त्यातुन २ जानेवारी रोजी संपुर्ण राज्यात एकाच वेळी दिवसभर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात कोणताही पक्ष, समाज, धर्म, संघटना व संस्थांच्या बॅनर्स, पोस्टर्सना दूर ठेवण्यात आले असून, निव्वळ भुजबळ समर्थक अशा एकच ओळखीतून सर्व जमणार आहेत.
भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:44 PM
नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार विरोधात रोष निर्माण झालेला असून, तो व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस, समता परिषद वा तत्सम संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र न ...
ठळक मुद्देपक्ष, संघटनेचे बॅनर बाजुला : २ जानेवारीला राज्यभर सत्याग्रहराज्यात एकाच वेळी दिवसभर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह