१) दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांशी तत्काळ चर्चा करून तीनही कृषी विधेयके रद्द करण्यात यावी.
२) शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित हमीभाव देण्यात यावा.
३) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे.
४)अतिरिक्त वीजबिल माफ करून शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा.
५) अडचणीतील शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवा.
६) कोरडवाहू शेतीसाठी सिंचन सुविधा उफलब्ध करून द्यावी.
इन्फो-
शेतकरी आंदोलनाला विद्यार्थ्यांचाही पाठिंबा
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यात एआयएसएफसारख्या विद्यार्थी संघटनांनीही सहभाग नोंदवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी ‘मोदी सरकार होश में आओ, होश में आकर बात करो’, ‘अन्यायकारक कृषी विधेयक मागे घ्या’, शेतकरी एकता जिंदाबाद’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.