लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामुळे तालुक्यासह परिसरातील रुग्णांची ऑक्सिजनअभावी होणारी गैरसोय दूर झाली आहे.
जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी खासदार गोडसे यांनी केलेले काम अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी येथे केले. सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण करण्यात आले. या युनिटच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन वाजे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह शिवसेना युवा नेते उदय सांगळे, सभापती शोभा बरके, नगराध्यक्ष किरण डगळे, उपसभापती संग्राम कातकाडे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, शहरप्रमुख गौरव घरटे, पिराजी पवार, बांधकाम व्यावसायिक अभय चोकशी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी. टी. कडलग, आदी मान्यवर उपस्थित होते.
------------
हे युनिट बडोदा येथील ॲरो या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता प्रतितास १० एन. एम. क्यू. म्हणजे १६० लीटर इतकी आहे. या युनिटमुळे सुमारे ४५ ते ५० रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असून, दिवसभरात सुमारे ४० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरता येणे शक्य आहे. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याने सिन्नरसह तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
--------------------
अन् खासदार पोहोचले कोरोनाबाधितांच्या वाॅर्डात
लोकार्पण कार्यक्रमाआधी खासदार गोडसे हे सिन्नर रुग्णालयात दाखल झाले. कोरोनाबाधितांचा वॉर्ड कुठे आहे, याची अधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा करत ते थेट कोरोनाबाधित रुग्णांच्या वाॅर्डात पोहचले. तिथे जाऊन गोडसे यांनी वाॅर्डाच्या स्वच्छतेची आणि ऑक्सिजनच्या होत असलेल्या पुरवठ्याची माहिती थेट कोरोनाबाधित रुग्णांकडून जाणून घेतली. यावेळी गोडसे यांनी वाॅर्डातील रुग्णांची आपुलकीने चौकशी केली.
--------------
सिन्नर ग्रामीण रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, उदय सांगळे, डॉ. वर्षा लहाडे, शोभा बरके, किरण डगळे, हेमंत वाजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (१२ सिन्नर १)
===Photopath===
120521\12nsk_17_12052021_13.jpg
===Caption===
१२ सिन्नर १