लासलगाव : स्मशान म्हटलं की अंगावर काटा येतो परंतु मागील काहीवर्षांपासून रात्रीच्या अंधारात स्मशानभूमीत दीपावली सण साजरा करून प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रध्दा निर्मूलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पिंपळगावनजीक येथील अमरधाम विकास समितीच्या वतीने यंदाही फटक्याच्या आतषबाजित, मिठाईचे वाटप करत चिमुकल्यांसोबत स्मशानभूमीत उत्साहात दिवाळी साजरी केलीयावेळी प्रमुख पाहुणे कवी शिरीष गंधे, अमरधाम विकास समितीचे शाम मोरे, सुहास ठाकरे, दिलावर काजी, गोरख वडनेरे, चांगदेव भुजबळ, सचिन विंचू, प्रकाश आंबेकर तसेच ग्रामस्त मधुकर भोर, किशोर क्षीरसागर, सुकदेव भुजबळ, कैलास खुटे, किशोर वाघ, संतोष भुजबळ, राजेंद्र बोरसे, बाळासाहेब घोडे, भरत फंड, पोपट पवार , भाऊसाहेब सोनवणे,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपळगाव नजीक येथील तरुणांनी चार वर्षापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान सुरू करून गावातील अमरधाम येथे झाडे लाऊन परिसर स्वच्छ केला व महाराष्ट्रातील पहिली अमरधाम विकास समिती स्थापन केली. त्यानंतर प्रा. गंधे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यात येते. यंदाचे हे चौथे वर्ष असून, यातून डॉ. दाभोळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली असल्याचे अध्यक्ष शाम मोरे यांनी सांगितले आहे याठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून, दिवे, आकाशकंदिल लावून विद्युतरोषणाई करण्यात आली होती. परिसरातील सर्व लहान मुलांना फटके व मिठाईचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)
अंधश्रध्दा निर्मूलन : प्रत्यक्ष कृतीतून दिला संदेश
By admin | Published: October 29, 2014 10:34 PM