लासलगाव : परिसरातील सुशिक्षित एजंटांची सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या सहकाºयांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री १० वाजता गुन्हा दाखल झाला आहे. लासलगाव येथील कविता पगार यांनी पती अनिल पगारे यांच्या निधनानंतर मिळालेली १५ लाख ३०० रुपयांची तसेच परिवारातील सदस्यांच्या विविध नावाने गुंतवणूक केली होती; परंतु ही रक्कम मिळाली नाही. लासलगाव येथील अनिल गवळी, विजय भोर, रूपेश पांडे, पंकज सुर्वे, संतोष जगताप, संतोष खाडे, तसेच देवळा येथील दीपक पगार व डॉ. भूषण अहेर यासह मोठ्या प्रमाणावर एजंटांमार्फत मोठी गुंतवणूक केल्या होत्या. या कंपनीने येथील कोटमगावरोडवर स्वमालकीचे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या; परंतु रक्कम देण्यात टाळाटाळ केली आत असे. तसेच सध्या हे कार्यालय बंद आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता या गुन्ह्याची व्याप्ती वाढून करोडो रुपयांच्या फसवणुकीचा मोठा घोटाळा उघडकीस येईल, असे लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले. सुरुवातीला तीन चार वर्षांपूर्वी ट्ंिवकल या नावाने लासलगावसह नाशिक जिल्ह्यात शिक्षक व लालची गुंतवणूकदार तसेच राष्टिÑयीकृत बँकेत ठेव ठेवणारे ठेवीदार तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना तुमची रक्कम किती प्रचंड वाढेल. या प्रकारचा भूलभुलय्या परिसरातील प्रचंड कमिशन घेऊन महागड्या गाड्या खरेदी करून भुलविणारे एजंट यांनी स्वत:चे कमिशनकरिता या गुंतवणूकदारांना आर्थिक संकटात आणले आहे. या एजंटाना तातडीने पोलिसांनी अटक करून त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी, अशी मागणी त्रस्त गुंतवणूकदारांनी केली आहे. अधिक तपास नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक दीपक गिºहे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करीत आहेत.
अपहार : लासलगावी ट्विंकल स्टार कंपनीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल ठेवीदारांना ८० लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:16 AM
लासलगाव : सुशिक्षित एजंटांची सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या सहकाºयांविरुद्धगुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देसदस्यांच्या विविध नावाने गुंतवणूकसध्या हे कार्यालय बंद आहे