नाशिक : नाशिक शहरात व जिल्ह्यात एकूण ९२ पूरबाधित क्षेत्रातील तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह आमदार बाळासाहेब सानप व आमदार सीमा हिरे यांनी गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले.निवेदनात म्हटले आहे की, २ आॅगस्टच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर येऊन नदीकाठचे नाशिक शहरातील मंगलवाडी, जोशीवाडा, मल्हारखाण, गंगावाडी, गोदावरीनगर, सराफ बाजार, भांडी बाजार, कापड बाजार, नेहरू चौक, दहीपूल, शुक्ल गल्ली, गणेशवाडी, संभाजी चौक, काझीगढी आदि भागांत तसेच ग्रामीण भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे यांसह जवळपास ९२ गावे पूरबाधित झाली आहेत. महापुरामुळे लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. काही दुकाने संपूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडलेत, जनावरे वाहून गेलीत तसेच जीवितहानी सुद्धा झाली आहे. (प्रतिनिधी)
पूरबाधित नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत
By admin | Published: August 05, 2016 1:07 AM