शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

गणेश मंडळांच्या भावनांचा उद्रेक ;  गणेशोत्सवात निषेधाचे फलक लावण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:23 AM

णेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून, मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे.

नाशिक : गणेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून, मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे. यासंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.३) आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी नियमावलीशिवाय शहरात एक इंच जमीन देता येणे शक्य नसल्याचे सांगितल्याचे पदाधिकाºयांचे म्हणणे असून, त्यामुळे संतप्त मंडळ कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून गणेशोत्सवात निषेधाचे फलक लावण्याचा निर्णय तातडीच्या बैठकीनंतर जाहीर केला.  विशेष म्हणजे यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी बैठक सुरू असतानाच पालकमंत्री गिरीश महाजन यांना दूरध्वनी केला. मात्र त्यांनीदेखील हतबलता व्यक्त केली असून त्यामुळे आंदोलने होणारच, अशी भूमिका त्यांनी तसेच राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी घेतली. महापालिकेच्या विविध विभागात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे. मात्र महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे रस्त्याच्या एकूण रुंदीच्या तुलनेत एक चतुर्थांश जागेतच परवानगी देण्याचा दंडक घातल्याने मोठ्या मंडळांची अडचण झाली आहे.  विशेषत: मध्य नाशकात यासंदर्भात मोठी अडचण झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत तसेच नाशिक आणि पंचवटी गावठाणमध्ये तर मंडपच बांधणे शक्य होणार नसल्याने मंडळांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.३) आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले.  मंडप उभारणी परवानगीबाबत महापालिकेच्या जाचक नियमावली शिथिल कराव्यात, मंडपासाठी बांधकाम विभागाच्या ना हरकत दाखल्याची अट वगळावी आणि जाहिरात कर नसावेत, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटी असल्याचे सांगितले आणि मात्र त्यांनी नियम शिथिल करण्यास नकार दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी नियमात राहून मंडप उभारणी शक्य नसल्याने गुन्हे दाखल करा, असे सांगितले मात्र आयुक्तांनी ते मान्य केले नाही, असे गजानन शेलार यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रामसिंग बावरी, पद्माकर देशपांडे, देवांग जानी, बबलूसिंग परदेशी यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा समावेश होता.  या प्रकारानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांत असंतोषाचा उद्रेक झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे आणि राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी सांगितले. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनाही महामंडळाच्या पदाधिकाºयांनी निवेदन दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGanpati Festivalगणेशोत्सव